'अखेरपर्यंत त्याच्या मनात 'ती' सल राहिली', वर्षा उसगावकर यांनी सांगितला लक्ष्मीकांत बेर्डेच्या आयुष्यातील माहित नसलेला किस्सा

Varsha Usgaonkar Birthday: मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी 28 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा केला.
Varsha Usgaonkar & Laxmikant Berde
Varsha Usgaonkar & Laxmikant BerdeDainik Gomantak
Published on
Updated on

Laxmikant Berde Life Journey: मराठी सिनेसृष्टीची 'अप्सरा' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी 28 फेब्रुवारी रोजी आपला वाढदिवस साजरा केला. या खास निमित्ताने त्यांनी आपल्या अभिनय प्रवासातील अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. मात्र, या आठवणींमध्ये सर्वात भावूक करणारा किस्सा होता तो म्हणजे मराठी मनावर राज्य करणाऱ्या लक्ष्मीकांत बेर्डे याचा. लक्ष्याच्या आयुष्यातील एक अशी खंत, जी त्याने अखेरपर्यंत काळजात जपली, त्याचा खुलासा वर्षा उसगावकर यांनी केला.

वर्षा उसगावकर यांनी सांगितले की, लक्ष्मीकांत बेर्डे याची प्रतिमा प्रेक्षकांच्या मनात केवळ एक 'विनोदी नट' अशीच पक्की झाली होती. मी अशोक सराफ आणि लक्ष्मीकांत यांच्यासोबत अनेक हिट चित्रपट दिले. प्रेक्षक त्यांना पाहून पोट धरुन हसायचे, पण याच प्रतिमेमुळे लक्ष्याला खूप अस्वस्थ वाटायचे. त्याला नेहमी असे वाटायचे की, आपण केवळ हसवणारे कलाकार नसून, आपल्यात एक गंभीर आणि संवेदनशील अभिनेताही दडलेला आहे. अभिनयाचे वेगळे पैलू जगाला दाखवण्याची त्याला प्रचंड ओढ होती, पण त्याला तशा संधी मिळत नव्हत्या.

Varsha Usgaonkar & Laxmikant Berde
Varsha Usgaonkar: "घरच्यांना वाटायचं मी राजकारणात जाईन, पण..." मडगाव पालिकेत वर्षा उसगावकरांची दिलखुलास फटकेबाजी

हीच खंत दूर करण्यासाठी ज्येष्ठ दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांनी जेव्हा 'एक होता विदूषक' हा चित्रपट बनवण्याचे ठरवले, तेव्हा लक्ष्याने त्याला मिळालेली ही संधी सोन्यासारखी मानली. या सिनेमासाठी त्याने स्वतः वर्षा उसगावकर (Varsha Usgaonkar) यांना फोन केला. तो फोन वर्षा यांच्या आजही स्मरणात आहे. लक्ष्या म्हणाला होता, "वर्षा, हा चित्रपट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. मला माहीत आहे की, या सिनेमात मानधन खूप कमी मिळणार आहे, पण तरीही मला तूच या चित्रपटात माझ्यासोबत हवी आहेस." लक्ष्याचा तो शब्द आणि भूमिकेप्रती असलेली त्याची निष्ठा पाहून वर्षा उसगावकर यांनी लगेच होकार दिला.

Varsha Usgaonkar & Laxmikant Berde
Varsha Usgaonkar: 'गोव्याची पोरगी, तू इथे कशी?' चक्क बाळासाहेबांच्या शेजारी राहायच्या वर्षा उसगावकर; वाचा मजेदार किस्से

चित्रपटाच्या सेटवरचा अनुभव सांगताना वर्षा उसगावकर म्हणाल्या, "मला तिथे एक पूर्णपणे वेगळाच लक्ष्या पाहायला मिळाला. ज्याचे काम नसले तरी तो तासन् तास सेटवर बसून इतरांचे चित्रीकरण पाहायचा. विदूषकाच्या भूमिकेत त्याने स्वतःला पूर्णपणे झोकून दिले होते. त्याचे डोळे बोलके होते आणि त्याचा अभिनय काळजाला भिडणारा होता."

दुर्दैवाने, लक्ष्मीकांत बेर्डे याचे अकाली निधन झाले, पण 'एक होता विदूषक' या चित्रपटाच्या रुपाने त्यांनी आपल्यातील 'नट' काय असतो, हे सिद्ध करुन दाखवले. वर्षा उसगावकर यांच्या या खुलाशामुळे लक्ष्याचा एक हळवा आणि संवेदनशील पैलू पुन्हा एकदा जगासमोर आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com