Goa Theft: केपेत सोनं खरेदीच्या बहाण्याने 2.52 लाखांचे दागिने 'गायब', एका महिलेला अटक, दोघांचा शोध सुरु

Quepem: दक्षिण गोव्यातील केपे येथील 'भवानी गोल्ड ज्वेलर्स' या दागिन्यांच्या दुकानात सुमारे दोन महिन्यांपूर्वी भरदिवसा घडलेल्या चोरीच्या प्रकरणात अखेर एका महिलेला अटक केलीय.
Goa Theft
Goa TheftDainik Gomantak
Published on
Updated on

केपे: दक्षिण गोव्यातील केपे येथील 'भवानी गोल्ड ज्वेलर्स' या दागिन्यांच्या दुकानात सुमारे दोन महिन्यांपूर्वी भरदिवसा घडलेल्या चोरीच्या प्रकरणात अखेर एका महिलेला अटक करण्यात आली आहे. उर्वरित दोन महिला अद्याप फरार असून त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.

केपे येथील 'भवानी गोल्ड ज्वेलर्समध्ये दोन महिन्यांपूर्वी तीन महिला दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्या होत्या. त्याचवेळी एक पुरुष ग्राहकही त्या दुकानात अंगठी खरेदी करत होता. या गर्दीचा आणि गोंधळाचा फायदा घेत, तिन्ही महिलांनी दुकानातील मालकिणीला लहान मुलासाठी सोन्याची चैन दाखवण्याची मागणी केली.

यानंतर मालकीण चैनचा ट्रे आणण्यासाठी बाजूला गेली असता, महिलांनी अंगठ्यांच्या ट्रेमधून दोन सोन्याच्या अंगठ्या आणि हारांच्या ट्रेमधून एक सोन्याचा हार असा सुमारे २.५२ लाख रुपयांचा ऐवज चोरून पोबारा केला.

Goa Theft
Goa Tourism: रशिया, युक्रेन युद्धामुळे विदेशी पर्यटक कमी? शॅकमालकांचा दावा; महागाईसोबत अनेक मुद्द्यांकडे वेधले लक्ष

चोरी लक्षात येताच दुकानातील कर्मचारी सीसीटीव्ही फुटेज पाहून महिलांच्या मागावर गेले, परंतु त्या सापडल्या नाहीत. दुकान मालकांनी या घटनेची तक्रार पोलिसांत नोंदवली होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू ठेवत अखेर या तिन संशयितांपैकी एका महिलेला अटक केली आहे. तिच्याकडून गुन्ह्याबाबत सखोल चौकशी सुरू असून उर्वरित दोन महिलांचा शोध सुरू आहे.

Goa Theft
Goa Stampede: सरणं विझली... राख उरली...अन्‌ अश्रू थिजले! मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांचा काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश

या घटनेनंतर स्थानिक व्यावसायिकांमध्ये चोरीच्या घटनांबाबत भीतीचं वातावरण आहे. भरदिवसा दुकानात घडलेली ही घटना म्हणजे सुरक्षेच्या बाबतीत गंभीर इशारा मानला जात आहे. पोलिसांनी सर्व दुकानांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा कार्यरत ठेवण्याचे आवाहन केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Jambavali Goshala Demolition Case
Karnataka Stolen Gold Case
Margao Woman Cheated 33 lakhs
Cyber Crime
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com