पणजीत भाजपप्रणित पॅनलची लागणार कसोटी; बाबूशसमोर कठीण आव्‍हान, सरकारविरोधी वातावरणाचे राजधानीत पडसाद

Panjim Muncipal Election: राज्यभरात सुरू असलेली विविध आंदोलने आणि सरकारविरोधी वातावरणाचे पडसाद आता राजधानी पणजीतही उमटू लागले आहेत.
Panjim Muncipal Election
Panjim Muncipal ElectionDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यभरात सुरू असलेली विविध आंदोलने आणि सरकारविरोधी वातावरणाचे पडसाद आता राजधानी पणजीतही उमटू लागले आहेत. आंदोलनांचे केंद्रबिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पणजीतील राजकीय घडामोडींमुळे सत्ताधारी भाजपप्रणित मंत्री बाबूश मोन्‍सेरात गटासमोर यंदाच्या महानगरपालिका निवडणुकीत कठीण आव्हान उभे ठाकले आहे.

या निवडणुकीत बाबूश मोन्सेरात यांच्या नेतृत्वाखालील ‘प्रगतिशील पणजीसाठी एकत्र’ पॅनलसमोर उत्पल पर्रीकर, दत्तप्रसाद नाईक आणि सुरेंद्र फुर्तादो यांच्या नेतृत्वाखालील ‘आमी पणजेकार’ पॅनलने दंड थोपटले आहेत. ३० जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Panjim Muncipal Election
Goa Bomb Threat: मोठी बातमी! पणजीतील पासपोर्ट भवन बॉम्बने उडवून देण्याची धमकी; प्रशासनाची धावपळ अन् परिसरात भीतीचे वातावरण

बाबूश मोन्सेरात यांनी ३० पैकी ३० जागा जिंकण्याचा निर्धार जाहीर केला आहे. निवडणूक जाहीर होण्यापूर्वी ५० टक्के नवे चेहरे देण्याचे आश्‍‍वासन त्यांनी दिले होते; मात्र प्रत्यक्षात केवळ सात नव्या उमेदवारांना संधी देण्यात आलीय.

उर्वरित ठिकाणी विद्यमान व माजी नगरसेवकांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. दरम्यान, भाजपचे पणजी मंडळ निवडणुकीत ठळकपणे सक्रिय दिसत नसल्याचे बोलले जात आहे.

जाहिरातीवरून उलटसुलट चर्चा

मनपा निवडणूक पक्षाच्या चिन्हावर होत नसल्याने प्रसिद्ध झालेल्या जाहिरातींमध्‍ये केवळ बाबूश मोन्सेरात यांचे छायाचित्र उमेदवारांसोबत झळकले आहे. मात्र २०२१ मधील निवडणुकीच्या जाहिरातींमध्‍ये मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि तत्कालीन भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांची छायाचित्रे होती. यावेळच्‍या बदलामुळे भाजपच्या पारंपरिक कार्यकर्त्यांत उलटसुलट चर्चा रंगली आहे.

Panjim Muncipal Election
Goa Shigmo Festival: डिचोलीत शिमगोत्सवाचा जल्लोष; सर्वत्र उत्साह, घुमचे कटर घूम; परंपरा, श्रद्धा आणि जल्लोषाचा संगम

‘स्मार्ट सिटी’ की ‘स्पा सिटी’?

आमी पणजेकार’चे नेते उत्पल पर्रीकर यांनी एका खासगी यू-ट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत पणजीचा उल्लेख ‘स्मार्ट सिटी’ऐवजी ‘स्पा सिटी’ असा केला आहे. शहरात वाढत चाललेल्या स्पा सेंटरच्या संख्येकडे लक्ष वेधत त्यांनी प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्‍‍नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्‍हणजे त्‍यांच्‍या या वक्तव्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com