
गोवा प्रदेश महिला काँग्रेस कमिटीने नर्सवर लैंगिक अत्याचार केल्याबद्दल कुंक्कळी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपी डॉ. सॅम्युअल अरवातिगी यांचे क्लिनिक तात्काळ बंद करून सील करण्याची मागणी करत निदर्शने केली.
अस्नोडा येथील जलशुद्धीकरण केंद्रातील देखभालीच्या कामामुळे ७ आणि ८ मे २०२५ रोजी संपूर्ण बार्देश तालुका आणि डिचोली तालुक्याच्या काही भागात पाणीपुरवठा मर्यादित असेल.
सोमवारी करंझाळेच्या शेतात मोठी आग लागली, ज्यामुळे परिसरात दाट पांढरा धूर पसरला. अग्निशमन दल घटनास्थळी.
गोव्यात ०६ आणि ०७ मे २०२५ रोजी ३०-४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. आयएमडी गोव्यात यलो अलर्ट जारी करतो.
शिरगाव लईराई जत्रोत्सव चेंगराचेंगरी प्रकरणी गोमॅकोत सोमवारी (5 मे) तीन नव्या रुग्णांना दाखल करण्यात आले. म्हापसा आझिलो येथे रुग्ण गेले असता त्यांना गोमॅकोत जाण्यास सांगण्यात आले. रुग्णांची संख्या आता रुग्ण 17 झाली असून कालपर्यंत 14 रुग्ण होते.
तथ्य शोध समितीचे अध्यक्ष आयएएस संदीप जॅक यांनी अधिक वेळ मागितला. अहवाल सादर होण्यास २-३ दिवस लागू शकतात.
दाडाचीवाडी धारगळ येथील श्री देव दाड देवस्थानचा पुनः प्रतिष्ठापना सोहळा येत्या ७ मे ते ९ मे पर्यंत साजरा होणार आहे.
गोवा स्टेट को-ऑपरेटिव्ह बँकेची संचालक मंडळाची मुदत संपल्याने हे संचालक मंडळ बेकायदेशीर कार्यरत असल्याने त्याच्याविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली. या याचिकेवरील सुनावणीवेळी गोवा खंडपीठाने सरकारला चांगले धारेवर धरले आणि त्यांना बँकेवर प्रशासकाची नेमणूक केव्हा करणार तसेच निवडणूक प्रक्रिया केव्हा सुरू करणार याची माहिती येत्या ८ मे पर्यंत देण्याचे निर्देश दिले आहेत
नदी नेव्हिगेशन विभागाने (आरएनडी) झुआरी नदीत एका खाजगी कंपनीने बांधलेल्या दोन रोल-ऑन/रोल-ऑफ (रो-रो) फेरी बोटीची चाचणी सुरू केली आहे. या फेरी लवकरच सेवेत दाखल केल्या जातील. रस्ते वाहतूक कमी करण्यासाठी डिझाइन केलेल्या या फेरी सध्या अंतिम टप्प्यातील चाचण्या आणि त्यांच्या अधिकृत लाँचिंगपूर्वी तांत्रिक समायोजनांमधून जात आहेत, असे रिव्हर नेव्हिगेशन संचालक विक्रमसिंह राजे भोसले यांनी दैनिक गोमंतकशी बोलताना सांगितले.
बागा येथे सहा वर्षीय मुलगी पाण्यात बुडाल्याची घटना घडल्यानंतर आता शिरवई केपे येथे ८ वर्षीय मुलगी पाण्यात बुडाल्याची घटना घडली आहे. पेडामळ येथील कॅनलमध्ये मुलगी बुडाली. शवविच्छेदनासाठी तिचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पुढील तपास सुरु आहे.
शिरगावच्या जत्रेत झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर देवस्थान समितीकडून सतर्कता बाळगली जात आहे. अखेरच्या दिवशी (०५ मे) भाविकांनी मंदिर परिसरात गर्दी करु नये, असे आवाहन देवस्थान समितीने आवाहन केले आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.