

फोंडा: नगरनियोजन (टीसीपी) कायद्यातील कलम ‘३९-अ’ रद्द करण्याच्या मागणीसाठी दोनापावला येथे मंत्री विश्वजीत राणे यांच्या खासगी बंगल्याबाहेर करण्यात आलेले आंदोलन चुकीचे आणि अयोग्य होते. यापुढे विनाकारण बाबांच्या वाटेला गेलात तर याद राखा. बाबा आमचे सर्वस्व आहेत. आता आम्ही गप्प बसणार नाही, असा कडक इशारा तिस्क-उसगाव येथील राणे समर्थकांनी आंदोलनकर्त्यांना दिला. तसेच त्यांच्या आंदोलनाचा तीव्र शब्दांत निषेध केला.
मंत्री राणे यांच्यावर करण्यात आलेली वैयक्तिक, आक्षेपार्ह टीका व घोषणांमुळे तिस्क-उसगाव परिसरातील समर्थक संतप्त बनले आहेत. आज त्यांनी एकत्र येत राणेंना भक्कम पाठिंबा दर्शविला. यावेळी सरपंच प्रकाश गावडे, माजी सरपंच रामनाथ डांगी, तुळशीदास प्रभू, जिल्हा पंचायत सदस्या समीक्षा नाईक यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एखाद्या मंत्र्याच्या खासगी निवासस्थानी जाऊन आंदोलन करणे लोकशाही मूल्यांना धरून नाही. कोणताही प्रश्न मांडण्यासाठी शासनाकडे अधिकृत व्यासपीठ उपलब्ध असताना दबावतंत्राचा अवलंब करणे चुकीचे आहे. अशा प्रकारे वैयक्तिक पातळीवर लक्ष्य केल्यास आता गप्प बसणार नाही, असेही राणे समर्थकांनी सांगितले.
नगरनियोजन कायद्यातील कलम ‘३९-अ’ हे विधानसभेत मंजूर झाल्यानंतर कायद्यात रूपांतरित झाले आहे. त्याची अंमलबजावणी करताना केवळ एका मंत्र्याला जबाबदार धरणे योग्य नाही. पणजीतील आझाद मैदानावरील आंदोलनानंतर दोनापावला येथे नेण्यात आलेला मोर्चा रोखण्यास पोलिसांना अपयश आले, असा आरोपही राणे समर्थकांनी केला.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.