Margao Fatorda Sewage Connection Dainik Gomantak
गोवा

Margao Fatorda Sewage Connection: मलनिस्‍सारण जोडणीचं काम अपूर्णावस्थेत, अनेक कारणांमुळे विलंब; मडगाव, फातोर्डातील ६० ते ७० टक्केच घरांना जोडणी

Goa Sewage Project Update: मडगाव शहर व फातोर्डा परिसरात असलेल्या रहिवासी घरांना मलनिस्‍सारण जोडणी देण्याचे काम सुरू असले तरी काही ठिकाणी लो लेईन्ग एरियामुळे ते अपूर्ण अवस्थेत राहिलेले आहे.

Sameer Amunekar

फातोर्डा : मडगाव शहर व फातोर्डा परिसरात असलेल्या रहिवासी घरांना मलनिस्‍सारण जोडणी देण्याचे काम सुरू असले तरी काही ठिकाणी लो लेईन्ग एरियामुळे ते अपूर्ण अवस्थेत राहिलेले आहे. मलनिस्‍सारण प्रकल्प कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरात व फातोर्डा परिसरात मिळून अंदाजित ६० ते ७० जोडणीचे काम पूर्ण झाले आहे.

काही ठिकाणी दाटीवाटीने असलेली घरे, काही ठिकाणी भाटकाराची आडकाठी, अन्य मालकांच्या जागेतून पाईपलाईन नेण्यास मालकाची हरकत, अन्य कारणांमुळे हा प्रकल्प या शहरात रखडून पडलेला आहे, अशी माहिती मिळाली.

दरम्यान, तळेबांद याठिकाणीही या प्रकल्पाचे अधिकतर काम पूर्ण झाले असल्याचे स्थानिक रहिवाशांनी सांगितले. एका ठिकाणी भाटकाराने आपल्या जमिनीतून पाईपलाईन नेण्यास आडकाठी केल्याने काही घरांची जोडणी अपूर्ण राहिलेली आहे, अशी माहितीही येथील स्थानिकांकडून देण्यात आली.

आके व मालभाट येथील सिने विशांत थिएटरच्या मागे असलेल्या काही घरांना जोडणी देण्यात आलेली नाही. येथील घरे दाटीवाटीने असल्याने चेंबर खोदण्यात अडथळा निर्माण होत आहे.

मोती डोंगर या झोपडपट्टीचा भाग डोंगरकड्यावर व उंच सखल असल्याने या ठिकाणी पाईपलाईन चेंबरचे पाणी परत येण्याची शक्यता असल्याने येथील काम काही काळासाठी स्थगित ठेवण्यात आले असल्याची माहिती प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

नाल्यांमध्ये सोडतात मल!

नगरसेवक कामिलो बार्रेटो यांनीही आपल्या प्रभागात काही ठिकाणी काम शिल्लक असल्याचे सांगितले. ज्यांनी जोडणी घेतली नाही ते रहिवासी २५ वर्षांपूर्वी सार्वजनिक बांधकाम खात्यांतर्गत देण्यात आलेल्या (एलआयजी) योजनेच्या टॉयलेटची दुरुस्ती करून आजही उपयोगात आणत आहेत.

तर काहीजणांनी टॉयलेटचा मळ जवळच्या नाल्यात सोडून दिलेला आहे. यात काही निवासी घरे, रेस्टॉरंट, हॉटेल्स व अन्य आस्थापनांचा समावेश आहे.

गोंधळाचे वातावरण

फातोर्डा परिसरातही अशीच परिस्‍थिती उद्धवलेली आहे. येथील प्रभाग १चे नगरसेवक फ्रान्सिस जोनास यांनी सांगितले की, येथील बिल्डिंगमधील रहिवासी अन्य ठिकाणी राहत आहेत.

त्यांना इकडे जोडणी नको आहे. जे येथे राहत आहेत त्यांना जोडणी हवी आहे. मात्र, हे काम सोसायटीअंतर्गत होत असल्याने सर्वांनी जोडणी घेणे अनिवार्य आहे, त्यामुळे येथे गोंधळाची स्थिती उद्भभवलेली आहे.

तोडग्यासाठी प्रयत्न सुरू

मडगाव पालिकेच्या नगरसेवक दीपा सावळ यांनी सांगितले की, आझाद नगरी या झोपडपट्टीत एकंदरीत १०० टक्के घरांना मलनिस्‍सारणाची जोडणी देण्यात आली आहे. काही ठिकाणी लो लेईन्ग एरियामुळे येथील काम रखडले आहे.

यात पप्‍पू गॅरेज, खारेबांद येथील घरांचा समावेश आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न खात्याकडून सुरू आहेत. तर आपल्या प्रभागात ९५ टक्के काम पूर्ण झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News Live: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या

Pandharpur Wari: 1566 साली लोक जुने गोवेतील रस्त्यांतून, अभंग म्हणत वारीला जात असल्याची नोंद आहे..

SCROLL FOR NEXT