Aam Aadmi Party & Congress
Aam Aadmi Party & Congress Dainik Gomantak
गोवा

Margao News : काँग्रेस- ‘आप’मध्ये वादाची ठिणगी पडणार? जि. पं. पोटनिवडणूक

गोमन्तक डिजिटल टीम

Margao News :

मडगाव, येत्या २३ जून रोजी होऊ घातलेल्‍या बाणावली येथील जिल्‍हा पंचायत पोट निवडणुकीच्‍या प्रश्‍नावरून बाणावलीत काँग्रेस आणि ‘आप’ या दोन पक्षात पुन्‍हा एकदा वादाची ठिणगी पडण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली जात आहे.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला ‘आप’कडून जी मदत मिळाली त्‍याच्‍या बदल्‍यात बाणावली पोट निवडणुकीची जागा आम्‍ही ‘आप’साठी खुली ठेवतो, असे वक्‍तव्‍य काँग्रेस प्रदेशाध्‍यक्ष अमित पाटकर यांनी केलेले असताना बाणावली गट काँग्रेस समितीने मात्र काँग्रेसने ही निवडणूक स्‍वबळावर आणि काँग्रेसच्‍या चिन्‍हावर लढवावी, अशी मागणी केली आहे.

या संबंधी काँग्रेस गट समितीने ठरावही घेतल्‍याची माहिती बाणावली गट समितीचे अध्‍यक्ष रुझारियो फर्नांडिस यांनी ‘गोमन्‍तक’ला दिली.

अध्‍यक्ष फर्नांडिस आणि उपाध्‍यक्ष किथ ग्रासियस यांनी दक्षिण गोवा जिल्‍हा अध्‍यक्षांना लिहिलेल्‍या पत्रात बाणावली जिल्‍हा पंचायत निवडणुकीत ‘आप’ला उमेदवारी न देता काँग्रेसतर्फेच ही निवडणूक लढवावी, असे म्‍हटले आहे. गेल्या पंधरा वर्षात बाणावलीत काँग्रेसचा आमदार नाही. या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला निवडून आणण्‍यासाठी बाणावलीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी झटून काम केले आहे.

त्‍यामुळे पुन्‍हा एकदा बाणावलीत काँग्रेस कार्यकर्त्‍यांमध्‍ये चैतन्‍य पसरले असून बाणावलीत काँग्रेसला उभारी घेण्‍यास ही उत्तम वेळ आहे. त्‍यामुळे ही निवडणूक काँग्रेसने स्‍वबळावर लढवावी, अशी मागणी केली आहे.

यासंबंधी गट समितीचे अध्‍यक्ष फर्नांडिस म्हणाले, काँग्रेसतर्फे निवडणूक लढविण्‍यासाठी आमचे दोन सदस्‍य इच्‍छूक आहेत. काँग्रेस ही निवडणूक सहज जिंकू शकते अशी आमची भावना असून ही जागा ‘आप’ला सोडण्‍याची आमची तयारी नाही. आम्‍ही आमच्‍या भावना जिल्‍हा समितीला कळवल्‍या आहेत.

‘आप’चे बाणावलीची जागा ‘आप’ला सोडण्‍यात येणार हे यापूर्वीच काँग्रेस प्रदेशाध्‍यक्षांनी स्‍पष्‍ट केलेले आहे. सर्व विरोधकांनी एकजूट दाखवून निवडणूक लढविणे ही सध्‍या काळाची गरज आहे. यासाठीच इंडिया आघाडी स्‍थापली आहे. ‘आप’ उमेदवार उभा करणार असून आमच्यापुढे चार नावे असून त्‍यांची छाननी सुरू आहे.

-वेंझी व्‍हिएगस,आमदार बाणावली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Filmcity: गोवा फिल्मसिटीच्या कामासाठी सरकारी हालचाली सुरु, वाद पुन्हा उफाळण्याची शक्यता

Goa Monsoon 2024: गोव्यात चार दिवस यलो अलर्ट; कोणत्या धरणात किती पाणीसाठी?

Panjim Police: रझिया गँगच्या दोघांना गोव्यातील हॉटेलमधून अटक; चोरीचे 3.75 लाखांचे दागिने जप्त

Goa Todays Live Update: म्हादईच्या पात्रात मोठी वाढ!

Merces: मेरशी गॅस गळती प्रकरण; क्लोरिन सिलिंडर आला कुठून? 15 दिवसांत उत्तर द्या

SCROLL FOR NEXT