

कळंगुट: हडफडे येथील मारिया दौरादो रिसॉर्ट परिसरात बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीवरून रस्त्यावर पडल्याने सहस्त्रांशू रवींद्र चंडेल (वय २६) या अलाहाबाद उत्तरप्रदेश येथील तरुणाचा मृत्यू झाला. दरम्यान, दुचाकीवर मागे बसलेला चंडेला याचा मित्र या अपघातात आश्चर्यकारकरित्या बचावला.
हा अपघात शनिवारी मध्यरात्री घडल्याचे हणजुण पोलिस सुत्रांनी सांगितले. सहस्त्रांशू चंडेल आपल्या अन्य तिघा मित्रांसमवेत पुण्याहून गोव्यात पर्यटनासाठी आला होता.
शनिवारी रात्री रेंट अ बाईक'वरून चंडेला व त्याचा मित्र हडफडे येथून बागा समुद्र किनाऱ्याकडे निघाले असता समोरून जात असलेल्या खाजगी पर्यटक बसगाडीला ओव्हरटेक करण्याच्या नादात चंडेल याचा दुचाकीवरील ताबा सुटला व तो आणि त्याचा अन्य एक मित्र मिळून दोघेही रस्त्यावर जोराने आपटले.
या अपघाताची माहिती मिळताच हणजुण पोलिस स्थानकाचे उपनिरीक्षक विराज नाईक व पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली व दोघांनाही कांदोळीच्या आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. दुर्दैवाने तेथील डॉक्टरांनी चंडेल याचा मृत्यू झाल्याचे सांगितले व दुसऱ्या जखमी तरुणाला उपचारासाठी दाखल करून घेतले.
अपघाताचा पंचनामा करून हणजुण पोलिसांनी चंडेल याचा मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळात पाठवून दिला असून पोलिसांनी मृताच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला आहे.
भोम येथे दोन दुचाकींच्या धडकेत एकाचा मृत्यू
भोम येथे दोन दुचाकींच्या जोरदार टकरीत एका दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याची दुर्घटना काल रविवारी रात्री नऊच्या सुमारास घडली. मयत दुचाकीस्वाराचे नाव मुकुंद सरनाईक (वय ४३) असे असून तो करंझाळ मडकई येथील रहिवासी आहे.
या अपघातात दुसरा दुचाकीस्वार विश्वजीत गावडे (वय २७) मावजोवाडा कुंडई हा किरकोळ जखमी झाला. मुकुंद सरनाईक हा दुचाकीने फोंड्याच्या दिशेने येत असताना दुसऱ्या बाजुने येणाऱ्या दुचाकीस्वार विश्वजीत गावडेची जोरदार ठोकर मुकुंद सरनाईक याच्या दुचाकीला बसली.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.