Marathi Schools Dainik Gomantak
गोवा

Marathi Schools: डिचोलीत मराठी शाळांना घरघर! पटसंख्येअभावी टाळं लावण्याची ओढावली नामुष्की; यंदाही एक ते दोन शाळा होणार बंद

Bicholim Marathi Medium Schools: नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले की, मराठी शाळांची स्थिती स्पष्ट होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात तालुक्यात चक्क चार सरकारी प्राथमिक शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली होती.

गोमन्तक डिजिटल टीम

डिचोली: मराठीप्रेमींचा तालुका अशी ओळख असलेल्या डिचोली तालुक्यात गेल्या काही वर्षांपासून मराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळांवर गंडांतर येत असून, गेल्या शैक्षणिक वर्षाप्रमाणे चालू शैक्षणिक वर्षांतही एक ते दोन शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण खात्यावर येणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

नवीन शैक्षणिक वर्ष सुरु झाले की, मराठी शाळांची स्थिती स्पष्ट होणार आहे. गेल्या शैक्षणिक वर्षात तालुक्यात चक्क चार सरकारी प्राथमिक शाळा बंद करण्याची वेळ शिक्षण खात्यावर आली होती. शहरातील लामगावसह कारेखाजन-विर्डी, चिंचवाडा-पाळी आणि आमठाणे-मेणकूरे येथील मिळून चार प्राथमिक शाळांना पटसंख्येअभावी 'टाळे' लागले आहेत.

सरकारी शाळांच्या घसरणाऱ्या शैक्षणिक दर्जामुळे मराठी माध्यमाच्या शाळांना वाईट दिवस आले आहेत. असा एक समज असला, तरी शाळा (Schools) बंद पडण्यास पालकही तेवढेच जबाबदार असल्याच्या प्रतिक्रिया शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त होत आहेत. दरम्यान, या शाळा वाचवण्यासाठी खुद्द पालकांनी पुढाकार घ्यायला हवा.

पाच वर्षात १३ शाळा बंद

गेल्या दहा वर्षांपासून डिचोली (Bicholim) तालुक्यात मराठी माध्यमाच्या सरकारी शाळांवर संक्रांत आली आहे. २०१९-२० या शैक्षणिक वर्षापर्यंत डिचोली तालुक्यात मराठी माध्यमाच्या ७८ सरकारी प्राथमिक शाळा होत्या. मात्र पटसंख्येअभावी एक-एक करीत गेल्या वर्षी शैक्षणिक वर्षापर्यंत १३ शाळा बंद पडल्या आहेत, अशी माहिती शिक्षण खात्याच्या सूत्रांकडून मिळाली. यात मुळगाव, व्हाळशी येथील अग्रेसर शाळांचा समावेश आहे. मात्र व्हाळशी येथील शाळा सोडल्यास बंद पडलेल्या अन्य शाळा पुन्हा सुरूच झाल्या नाहीत.

बंद पडलेल्या शाळा इमारतींची दुरवस्था

शिक्षण खाते आणि पालकांच्या अनास्थेमुळे बंद पडलेल्या सरकारी शाळा इमारतींची आता दुरवस्था होत आहे. डिचोली शहरातील व्हाळशी सरकारी शाळा ही एक आघाडीवर होती. मात्र पटसंख्येअभावी २०१९-२० या शैक्षणिक वर्षात ही शाळा बंद पडली. सरकार दरबारी प्रयत्न करून दीनदयाळ जनसेवा प्रतिष्ठानने ही शाळा इमारत ताब्यात घेतली आणि या इमारतीत खासगी शाळा सुरु केली आहे.

कारणे काय?

बदललेली जीवनशैली आणि बदलते ''फॅड'' यामुळे बहुतांश पालकांचा कल शहरी भागातील शाळांकडे असल्याचे शिक्षण खात्याचे एक निरीक्षण आहे.

पालक आपल्या पाल्यांना गावातील शाळांऐवजी शहरातील शाळांनी पाठवत आहेत. त्यामुळे हळूहळू ग्रामीण भागातील शाळा बंद पडू लागल्या आहेत.

डिचोली शहरात अनुदानित खासगी प्राथमिक शाळा आहेत. त्यात तीन इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. त्यामुळे इंग्रजीच्या फॅडमुळे सरकारी प्राथमिक शाळांना वाईट दिवस आले आहेत, असेही म्हणता येणार नाही.

घटलेला जन्मदर आणि पालकांमधील वाढत्या स्पर्धेमुळे सरकारी प्राथमिक शाळांचे भवितव्य धोक्यात आले आहे, अशी खंत शिक्षण खात्याशी संबंधित एका अधिकाऱ्याने व्यक्त केली आहे.

काही शाळा तर नोकरीधंद्या निमित्त वास्तव्य करणाऱ्या राज्याबाहेरील कामगारांच्या मुलांमुळे टिकून आहेत, असा दावाही शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करतात.

इंग्रजीचे माध्यमाचे फॅड

मराठी माध्यमाच्या सरकारी प्राथमिक शाळा बंद पडू नयेत, म्हणून सर्व साधनांनीयुक्त शाळा इमारती बांधण्याकडे सरकार भर देत आहे. गेल्या पाच-सहा वर्षांत डिचोली तालुक्यातील शाळा इमारतींची दुरुस्ती करतानाच काही शाळांसाठी नवीन सुसज्ज इमारती बांधल्या आहेत. एवढेच नव्हे, तर देशातील पहिली ग्रीन शाळा होण्याचा मान तालुक्यातील विठ्ठलापूर-कारापूर येथे शाळेला मिळाला आहे. तरीदेखील मराठी माध्यमाच्या मराठी शाळांना वाईट दिवस येऊ लागले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

मेघालयात कोळसा खाणीत भीषण स्फोट! डायनामाईटनं घेतला 10 जणांचा जीव; अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती

IND vs PAK: "त्यांनी नकार दिलाय, आम्ही नाही''! पाकड्यांच्या बहिष्कार नाट्यावर सूर्याचा रुबाब; वर्ल्ड कपच्या वादावर भारताची भूमिका स्पष्ट

Goa Sexual Assault: 23 वर्षीय तरुणानं अल्पवयीन मुलीला बनवलं शिकार! मायणा-कुडतरीतील संतापजनक प्रकार; नराधमाला पोलिसांनी ठोकल्या बेड्या

वळण ठरलं जीवघेणं! धार्मिक उत्सवावरुन परतताना काळाचा घाला, चालकाचं नियंत्रण सुटल्यानं बसचा भीषण अपघात; 15 ठार VIDEO

Shani Trayodashi 2026: 14 की 15 फेब्रुवारी, कधी आहे 'शनि त्रयोदशी'? साडेसातीपासून मुक्ती मिळवण्याचा सर्वोत्तम योग; जाणून घ्या पूजेची अचूक वेळ अन् शुभ मुहूर्त

SCROLL FOR NEXT