RBI New ATM Rules 2026: ATM वापरणाऱ्यांसाठी RBI चा नवा नियम! मोफत मर्यादा संपताच बँक पाठवणार अलर्ट; जाणून घ्या

RBI New ATM Rules Free Transaction Limit: तुम्ही जर नेहमी एटीएममधून पैसे काढत असाल किंवा शिल्लक रक्कम तपासत असाल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा नवा नियम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे.
RBI New ATM Rules Free Transaction Limit
RBI New ATM Rules 2026Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

RBI New ATM Rules Free Transaction Limit: तुम्ही जर नेहमी एटीएममधून पैसे काढत असाल किंवा शिल्लक रक्कम तपासत असाल, तर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा हा नवा नियम तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे. आरबीआयने 27 नोव्हेंबर 2026 रोजी एटीएम आणि PoS मशिनमधून पैसे काढण्यासंबंधी नवे मास्टर निर्देश जारी केले असून ते लगेच लागू झाले आहेत. आता ग्राहकांना महिन्याची मोफत एटीएम व्यवहारांची मर्यादा किती वापरली गेली आणि मर्यादा संपल्यानंतर किती शुल्क लागेल, हे समजण्याची सोय बँकांना करावी लागेल. तसेच, आरबीआयने 2008 ते 2022 दरम्यानचे 17 जुने परिपत्रक रद्द केले.

नव्या नियमांनुसार, ग्राहकांना त्यांनी महिन्यात किती मोफत व्यवहार केले याची माहिती देणारी व्यवस्था बँकांना उभारावी लागेल. तुम्ही एटीएम वापरल्यावर बँक एसएमएस किंवा इतर माध्यमातून किती मोफत व्यवहार शिल्लक आहेत, याचा संदेश देऊ शकेल. त्यामुळे पुढच्या व्यवहारावर शुल्क लागेल की नाही, याचा अंदाज आधीच येईल. शिवाय, एटीएम मेट्रो भागात आहे की नॉन-मेट्रो भागात, हे स्क्रीनवरील संदेश, स्टिकर किंवा पोस्टरद्वारे स्पष्ट केले जाईल. हा नियम सर्व सरकारी, खासगी, ग्रामीण, सहकारी बँका आणि पेमेंट संस्थांना लागू असेल.

RBI New ATM Rules Free Transaction Limit
RBI New Rules: सायबर चोरट्यांना बसणार मोठा दणका! बँकिंग अ‍ॅपमध्ये येणार 'स्टॉप स्विच' बटण, एका क्लिकवर रोखता येणार सर्व ऑनलाइन व्यवहार

मोफत एटीएम व्यवहारांच्या संख्येत सध्या कोणताही बदल केलेला नाही. दरमहा एकूण 5 मोफत व्यवहार मिळतील, ज्यात पैसे काढण्यासोबतच बॅलन्स तपासणे यांसारख्या सेवांचाही समावेश असेल. मेट्रो शहरांत 3 आणि इतर शहरांत 5 मोफत व्यवहार मिळतात; इतर बँकांच्या एटीएमसाठीही (ATM) एकूण 5 मोफत व्यवहारांची मर्यादा कायम आहे. मर्यादा संपल्यानंतर बँक प्रति व्यवहार कमाल 23 रुपये आणि कर आकारु शकते.

RBI New ATM Rules Free Transaction Limit
RBI Plastic Currency: 'आत्मनिर्भर भारता'चे आणखी एक पाऊल! केंद्र सरकारकडून 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिक नोटांच्या छपाईला मंजुरी

एटीएममध्ये रोकड नसणे, सर्व्हर बंद असणे किंवा तांत्रिक बिघाडामुळे व्यवहार अडकल्यास ते वैध व्यवहार मानले जाणार नाहीत आणि त्यावर कोणतेही शुल्क आकारता येणार नाही. दुसरीकडे, नव्या नियमांत PoS मशिनवरुन पैसे काढण्याचीही सोय आहे. त्यासाठी कोणतीही खरेदी करणे बंधनकारक नसून डेबिट कार्ड, फुल-केवायसी प्रीपेड कार्ड किंवा यूपीआय वापरता येईल. एका वेळी कमाल 2000 रुपये आणि महिन्याला 10,000 रुपयांपर्यंत रक्कम काढता येईल. शुल्क आकारल्यास ते रकमेच्या 1 टक्क्यांपेक्षा जास्त नसेल, आणि खरेदीसोबत पैसे काढल्यास बिलात दोन्ही रकमा स्वतंत्रपणे दाखवल्या जातील.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.