Golden Peacock Award: 'सुवर्ण मयूर' कोण पटकावणार? इफ्फीच्या समारोपाकडे चित्रपटप्रेमींचे लक्ष

57th IFFI Closing Ceremony: यंदाचा प्रतिष्ठेचा ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळणार, याबाबत चित्रपटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे.
57th IFFI Closing Ceremony
'सुवर्ण मयूर' कोण पटकावणार?Dainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: गेल्या आठ दिवसांपासून चित्रपट रसिकांना भुरळ घालणाऱ्या ५७ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा (इफ्फी) दिमाखदार समारोप सोहळा शनिवारी (ता. २८) सायंकाळी ५ वाजता डॉ. श्यामा प्रसाद मुखर्जी स्टेडियमवर रंगणार आहे. या सोहळ्याला मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री अश्विनी वैष्णव यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज उपस्थित राहणार आहेत.

यंदाचा प्रतिष्ठेचा ‘सुवर्ण मयूर’ पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळणार, याबाबत चित्रपटप्रेमींमध्ये कमालीची उत्सुकता आहे. या सोहळ्यात गांधी मेडलसह उत्कृष्ट दिग्दर्शक, अभिनेता आणि अभिनेत्री अशा विविध श्रेणींतील पुरस्कारांची घोषणा होणार आहे. सिंगापूरचे दिग्दर्शक ॲंथनी चेन यांच्या ‘वी आर ऑल स्ट्रेंजर्स’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाने महोत्सवाची सांगता होणार आहे. हा चित्रपट पणजी व पर्वरी येथील आयनॉक्स तसेच मडगाव येथील रवींद्र भवनमध्ये प्रदर्शित केला जाणार आहे.

57th IFFI Closing Ceremony
One Goa Project Stay: कारापूरमधील 'लोढा' प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाचा दणका; बांधकामासह परवानग्यांना स्थगिती

चोख सुरक्षा व्यवस्था

समारोप सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी स्टेडियम परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. प्रवेशद्वारावर तपासणी केल्यानंतरच प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. मुख्य सभागृहासह गॅलरीत बसूनही रसिकांना सोहळ्याचा आनंद घेता येणार आहे.

सीमाविरहित कथांची संकल्पना

यंदाचा इफ्फी ‘सीमाविरहित कथा’ या संकल्पनेवर आधारित होता. महोत्सवात ८४ देशांतील चित्रपटांचा समावेश होता. आंतरराष्ट्रीय विभागांतर्गत विविध चित्रपटांसह माहितीपट आणि ॲनिमेशनसाठी स्वतंत्र विभागांचा समावेश करण्यात आला होता. यंदाच्या महोत्सवात गोव्यातील १३ कोकणी आणि मराठी चित्रपटही प्रदर्शित करण्यात आले.

57th IFFI Closing Ceremony
Goa Politics: 'गोवा फॉरवर्ड'च्या विलिनीकरणाचा प्रस्ताव आल्यास काँग्रेस तयार; माणिकराव ठाकरे यांचे संकेत

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.