Bicholim: नदीतील गाळ काढताना जलवाहिनीला भगदाड, पाणीटंचाईचे संकट; डिचोलीत टँकरद्वारे पाणीपुरवठा

Bicholim River: नदीतील गाळ काढताना नदीतून गेलेल्या मोठ्या जलवाहिनीला भगदाड पडल्याने डिचोली शहरातील बहुतेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.
Bicholim river pipeline burst
Bicholim RiverDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: नदीतील गाळ काढताना नदीतून गेलेल्या मोठ्या जलवाहिनीला भगदाड पडल्याने डिचोली शहरातील बहुतेक भागात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली आहे.

उपलब्ध माहितीनुसार, रविवारी (ता.१८) सायंकाळपासून पाण्यासाठी मारामारी निर्माण झाली आहे. गाळ काढताना संबंधित ठेकेदाराला नदीतून गेलेल्या जलवाहिनीचा अंदाज आला नाही. त्यामुळे ही समस्या निर्माण झाली आहे. दरम्यान, गावकरवाडा परिसरात आज टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे.

Bicholim river pipeline burst
Bicholim River: मान्सूनपूर्वी डिचोली नदी होणार चकाचक! पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना; गाळ उपसण्याचे काम सुरु

पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या डिचोलीतील नदी स्वच्छ करण्यात येत आहे. शहरातील मुख्य नदीतील गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खास यंत्राद्वारे सध्या नदीत वाढलेली जलपर्णी काढण्यात येत आहे.

Bicholim river pipeline burst
Goa Water Crisis: ..आता पाण्याच्या बाटल्यांचाच आधार! सासष्टीतील अनेक भागांत पाणी टंचाई; ठोस उपाययोजना नाही

दुरुस्तीची प्रतीक्षा

गाळ काढताना गावकरवाडा येथे नदीतून गेलेली मोठी जलवाहिनी फुटली आहे. त्यामुळे रविवारी सायंकाळपासून गावकरवाडा, बंदरवाडा आदी काही भागांतील नळाद्वारे पाणीपुरवठा बंद आहे. दुसऱ्या बाजूने नदीतील पाणी नियंत्रणात आणून जलवाहिनीची दुरुस्ती करावी लागणार आहे. सोमवारी सायंकाळपर्यंत तरी हे काम सुरू होते. आता जलवाहिनीची दुरुस्ती कधी होते, त्याची प्रतीक्षा स्थानिकांना आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com