Bicholim River: मान्सूनपूर्वी डिचोली नदी होणार चकाचक! पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना; गाळ उपसण्याचे काम सुरु

Bicholim River Cleaning: मान्सूनपूर्व कामांतर्गत सध्या डिचोली शहरातील मुख्य नदीतील गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खास मशिनरीद्वारे सध्या नदीत वाढलेली जलपर्णी काढण्यात येत आहे.
River Cleaning in Bicholim
River Cleaning in BicholimDainik Gomantak
Published on
Updated on

डिचोली: पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सध्या डिचोलीतील नदी स्वच्छ करण्यात येत आहे. मान्सूनपूर्व कामांतर्गत सध्या डिचोली शहरातील मुख्य नदीतील गाळ उपसण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खास मशिनरीद्वारे सध्या नदीत वाढलेली जलपर्णी काढण्यात येत आहे. आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांच्या आदेशानुसार जलसंसाधन खात्यातर्फे हे काम करण्यात येत आहे.

शहरातील नदीत विविध ठिकाणी जलपर्णीचे आक्रमण वाढले आहे. दरवर्षी या नदीत मोठ्या प्रमाणात गाळ साचताना जलपर्णी उगवत असते. याखेरीज ही नदी प्लास्टिक आदी कचऱ्याने साचत असते.

River Cleaning in Bicholim
Sal River: करोडो रुपये जातात कुठे? पोर्तुगीजकाळापासूनचे वैभव ते गटारगंगा; प्रदूषणामुळे साळ नदीची दुरवस्था

पावसाळ्यात नदी तुंबली, की नदीबाहेर पाणी फुटून मोठी समस्या निर्माण होत असते. यापूर्वीही नदी तुंबून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. ही समस्या उद्भवू नये. त्यासाठी खास दोन तरंगती मशीन आणून जलपर्णी काढण्यात येत आहे.

River Cleaning in Bicholim
Mhadei River: 'म्हादईचा प्रवाह वळवणे म्हणजे गोव्‍याचा अंत...'; खासदार फर्नांडिस यांची राष्ट्रीय संस्थेच्या अहवालावर सडकून टीका

जलपर्णी काढल्यानंतर जेसीबी यंत्राद्वारे नदीतील गाळ काढण्यात येणार आहे अशी माहिती मिळाली आहे. पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण करण्याच्यादृष्टीने खात्याचे प्रयत्न चालू आहेत, अशी माहिती जलस्रोत खात्याच्या सूत्रांकडून मिळाली आहे. गेल्यावर्षीही मशिनरीद्वारे नाल्यातील जलपर्णी काढण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com