
डिचोली : शिरगावच्या जत्रेवेळी घडलेल्या दुर्दैवी दुर्घटनेत बळी पडलेल्यांना सरकारकडून नक्कीच न्याय मिळणार, असा विश्वास राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी व्यक्त केला. दुर्घटनेसंबंधी सत्यशोधन समितीकडून सादर करण्यात आलेल्या अहवालाचा अभ्यास करूनच सरकार योग्य ती कारवाई करणार, असा विश्वासही राज्यपालांनी व्यक्त केला.
राज्यपाल पी.एस. श्रीधरन पिल्लई यांनी काल शुक्रवारी (15 मे) दुपारी लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या शिरगाव येथील श्री लईराई देवीचे दर्शन घेतले. शिरगावच्या जत्रेत घडलेल्या दुर्घटनेनंतर राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी प्रथमच शिरगाव गावाला भेट दिली होती.
भविष्यात चेंगराचेंगरीसारखी दुर्घटना घडता कामा नये. त्यासाठी देवस्थान समितीने विशेष उपक्रम हाती घ्यावेत, असा सल्लाही राज्यपाल पिल्लई यांनी दिला.
राज्यपालांचे शिरगावात आगमन होताच देवस्थान समितीचे अध्यक्ष दिनानाथ गावकर आणि पदाधिकाऱ्यांनी त्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी राज्यपालांच्या सहचारिणी डॉ. रिटा पिल्लई, आमदार प्रेमेंद्र शेट यांच्यासह विविध सरकारी अधिकारी उपस्थित होते.
देवस्थानाला दिली ५० हजारांची देणगी
देवीचे दर्शन घेतल्यानंतर राज्यपाल श्रीधरन पिल्लई यांनी जत्रेवेळी ज्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली होती, त्या जागेची पाहणी केली. राज्यपालांकडून देवस्थानला ५० हजार रुपयांची देणगीही देण्यात आली. यावेळी उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष शंकर चोडणकर, झेडपी महेश सावंत, शिरगावसह विविध पंचायतींचे सरपंच, पंचसदस्य उपस्थित होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.