Goa Congress, Amit Patkar Dainik Gomantak
गोवा

Goa Congress: पर्रीकरांनी विरोध केलेल्या रेल्वेचा दुहेरी मार्ग रेटण्याचा प्रयत्न, काँग्रेसचा सरकारवर आरोप; पोलिसांच्या भूमिकेवर टीका

Railway Double Tracking Goa: राज्याला कोळसा साठवणूक केंद्राची गरज नसल्याचे त्यांनी जाहीरपणे संगितले होते. पर्रीकरांचा तो पत्रकार परिषदेचा व्हिडिओ याप्रसंगी दाखविण्यात आला.

Sameer Panditrao

पणजी: माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी २०१३ च्या मध्ये रेल्वे दुहेरी मार्गाला कडाडून विरोध केला होता. परंतु त्यांच्या भूमिकेला छेद देत सध्या भाजप सरकार बेकायदेशीपरपणे प्रकल्प पुढे रेटत आहे. दुहेरी मार्गाचे काम करण्यासाठी राज्यातील पोलिस टीसीपी, पोलिस खाते बिनदिक्कतणे मदत करीत असल्याचा आरोप प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेस भवनात शुक्रवारी झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश काँग्रेसचे कोषाध्यक्ष ऑरविल दुरादो, ऑलेन्सिओ सिमोईस, वेळसाव-पालीचे सरपंच मारिया डायाना गोव्हिया, वेळसावमधील जमीन मालक सँड्रा रॉड्रिगीस यांची उपस्थिती होती.

सुरुवातीला २०१३ मध्ये स्‍व. मनोहर पर्रीकर यांनी पत्रकार परिषद घेऊन मुरगाव पोर्ट ट्रस्टवरील बर्थ आणि कोळसा साठवणुकीला विरोध केला होता. पर्रीकरांनी थेट ज्या कंपन्या कोळसा साठवणूक करणार आहेत, त्याविरोधात आवाज उठवला होता.

राज्याला कोळसा साठवणूक केंद्राची गरज नसल्याचे त्यांनी जाहीरपणे संगितले होते. पर्रीकरांचा तो पत्रकार परिषदेचा व्हिडिओ याप्रसंगी दाखविण्यात आला. सध्याचे राज्य सरकार पर्रीकरांचा वारसा सांगते, तर मग त्यांनी केलेला विरोध हे सरकार आता विसरून गेले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health And Motor Insurance Price Cut: सर्वसामान्यांसाठी खूशखबर! स्वस्त होणार हेल्थ आणि मोटर इन्शुरन्स; अवाजवी कमिशनला लागणार लवकरच ब्रेक

Horoscope 25 Saptember 2026: धनलाभाचा प्रबळ योग आणि यशाचा मार्ग खुला! लाडक्या बाप्पाला निरोप देताना उजळणार 'या' राशींचं भाग्य; ग्रह-नक्षत्रांची मोठी उलथापालथ

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

SCROLL FOR NEXT