Amit Sawant 
गोवा

Amit Sawant: सरकारचे 'हे' कृत्य म्हणजे लोकशाहीची हत्या! मांद्रे सरपंच ॲड. अमित सावंत यांची मुख्यमंत्र्यांवर टीका

हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना डावलून आपला मनमानी कारभार करत आहे.

Kavya Powar

मांद्रे मतदारसंघात सुरू केलेल्या नव्या पोलीस स्थानकाच्या उद्घाटन सोहळ्यात स्थानिक सरपंच ॲड. अमित सावंत यांना आमंत्रण देण्यात आले नाही. तसेच पोलीस स्थानकाच्या पाटीवरही त्यांचे नाव लिहिण्यात आले नाही. यावरून संतप्त सरपंचांनी उपोषणाला बसण्याचा इशारा सरकारला दिला आहे.

याबाबत अमित सावंत यांनी पत्रकार परिषद घेतली होती. ते म्हणाले की जेव्हा या उद्घाटन सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिका छापण्यात आल्या होत्या, तेव्हाच मी याबाबत मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली होती. मात्र त्यांंनी यामध्ये कोणताच बदल केला नाही.

याआधीही अशाच घटना घडल्या आहेत. मोपामधील नवीन पोलीस स्थानकाच्या उद्घाटन सोहळ्यातही स्थानिक सरपंचांना डावलण्यात आले होते. त्याचप्रमाणे पाली येथील अबकारी खात्याच्या नवीन इमारतीच्या उद्घाटन सोहळ्यात पालीच्या सरपंचांना आमंत्रण नव्हते.

यावरून कळते की, हे सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना डावलून आपला मनमानी कारभार करत आहे. मुख्यमंत्र्यांचे हे कृत्य म्हणजे लोकशाहीचा खून आहे. त्यांना वाटलं की, मोपा आणि पालीचे सरपंच काही बोलले नाहीत म्हणजे मी देखील काहीच बोलणार नाही. पण याबाबत मी शांत बसणार नाही. सरकारच्या या कृत्याचा मी निषेध करतो.

आमरण उपोषण...

मांद्रे पोलीस स्थानकाच्या पाटीवर आपले नाव न आल्याने सरपंच अमित सावंत यांनी आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता ते म्हणाले की, मी त्यांना उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र मी कोणत्याही विकासकामाच्या विरोधात नाही.

माझ्या गावात नवीन पोलीस स्थानक झाले आहे; यानंतर जर मी काळे झेंडे हातात घेतले तर तो अपशकुन ठरेल. मला गावच्या विकासाच्या आडवे यायचे नाही. याबाबत मी काही अनुभवी व्यक्तींशी चर्चा केली असता, त्यांनीही मला असे न करण्याचा सल्ला दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Railway Diwali Bonus 2026: मोदी सरकारची रेल्वे कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट, 10 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना मिळणार बंपर बोनस; अखेर कॅबिनेटचा शिक्कामोर्तब

नाशिकच्या पाण्यत आढळले कर्करोगास कारणीभूत ठरणारे जीवघेणे रसायन; पर्यावरण संस्थेच्या अहवालात मोठा खुलासा

Farmers Drought Financial Relief: पावसाने हुलकावणी दिली पण सरकार धावून आले! दिवाळीपूर्वीच शेतकऱ्यांना 'इतक्या' हजारांची मदत जाहीर; वाचा ताजी अपडेट

Unlucky Zodiac Signs: पैशांची घ्या काळजी! शुक्र अस्तामुळे 'या' 4 राशींना बसू शकतो मोठा आर्थिक फटका; पुढील 14 दिवस अत्यंत कसोटीचे

Goa Under 23 Cricket: गोव्याच्या युवा क्रिकेटपटूंचा बडोद्यावर दबदबा! 158 धावांची आघाडी, मोठ्या आघाडीची संधी

SCROLL FOR NEXT