Lok Sabha Polls: लोकसभा निवडणुकीसाठी भाजपतर्फे प्रभारींची नियुक्ती! गोव्याचा कारभार आशिष सूद यांच्या हाती...

भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक प्रभारी आणि सह-निवडणूक प्रभारी निवडले आहेत.
Lok Sabha Polls
Lok Sabha PollsDainik Gomantak
Published on
Updated on

Lok Sabha Polls: भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राज्य निवडणूक प्रभारी आणि सह-निवडणूक प्रभारी निवडले आहेत. गोव्यासाठी आशिष सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Ashish Sood
Ashish SoodDainik Gomantak

याबाबत भाजपतर्फे यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये एकूण 23 राज्यांसाठी राज्य निवडणूक प्रभारी आणि सह-निवडणूक प्रभारी निवडण्यात आले आहेत. गोव्यासाठी आशिष सूद यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आशिष सूद हे भारतीय राजकारणी आणि दिल्लीतील भारतीय जनता पक्षाचे नेते आहेत. ते जम्मू आणि काश्मीर भाजप युनिटचे सहप्रभारी आहेत. भाजपचा स्पष्ट आवाज आणि नवी दिल्लीतील जनकपुरी मतदारसंघातील एक मजबूत स्थानिक चेहरा अशी त्यांची ओळख आहे.

इथे पहा संपूर्ण यादी

Bjp
BjpDainik Gomantak
Bjp
BjpDainik Gomantak

दक्षिण गोव्यातून भाजपचा उमेदवाराला भरघोष यश: मुख्यमंत्री

भाजप सरकार देशात साधनसुविधा व मानवतेचा विकास साधण्यावर जास्त लक्ष केंद्रित करत आहे. तसेच नारीशक्ती, युवाशक्ती, किसानशक्ती व गरीब कल्याण योजनेद्वारे प्रत्येकाचा विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकार पुढाकार घेत आहे.

त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत दक्षिण गोव्यातून भाजपचा उमेदवार 60 हजार मतांनी विजयी होणार आहे, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com