Congress spokesperson Sanjay Barde Dainik Gomantak
गोवा

Patradevi Checkpost: पत्रादेवी नाक्यावर गोवा सरकार महाराष्ट्र पोलिसांचा उपयोग करतंय का? संजय बर्डेंचा परखड सवाल

Kavya Powar

Maharashtra Police on Patradevi Check Post

मोरजी, पत्रादेवी चेकनाक्यावरून मोठ्या प्रमाणात दारूची तस्करी होत असल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत. त्याच अनुषंगाने थेट पत्रादेवी-गोव्याच्या हद्दीत ज्या ठिकाणी मोपा हद्दीतला पत्रादेवी पोलिस चेकनाका आहे.

त्या ठिकाणी सिंधुदुर्ग पोलिस मोठ्या प्रमाणात गोव्यातून महाराष्ट्रात जाणाऱ्या वाहनांची काटेकोरपणे तपासणी करत असल्याचे चित्र शनिवारी (ता.18) सायंकाळी दिसून आले.

याबाबत काँग्रेस प्रवक्ते संजय बर्डे यांनी सावंतवाडी पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी यांना निवेदन सादर केले. गोव्यातून जाणाऱ्या प्रत्येक वाहनांची तपासणी महाराष्ट्र पोलीस करत होते. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र आणि गोवा पोलिसांनी पेडणे अबकारी कार्यालयात झालेल्या मोठ्या घोटाळ्याची चौकशी संयुक्त विद्यमाने करून न्याय देण्याची मागणी केली.

महाराष्ट्र पोलिसांनी तीन महिन्यात पत्रादेवी चेकनाक्यावरून अवैध दारू वाहतूक केलेली एकूण 68 प्रकरणे, गुन्हे नोंद केले; तर मग हीच प्रकरणे गोवा अबकारी खात्याने का नोंद केली नाहीत? असा सवाल संजय बर्डे यांनी उपस्थित केला.

दरम्यान, ही अवैध वाहतूक रोखण्यासाठी सावंत सरकार महाराष्ट्र पोलिसांची मदत घेत आहे का हे त्यांनी स्पष्ट करावे. गोव्यात येऊन जर महाराष्ट्र पोलीस काम करत असतील तर गोवा पोलिसांना कमीपणा दाखवला जात आहे. त्यामुळे हे सरकार गोव्यासाठी आहे की महाराष्ट्रासाठी काम करते हे त्यांनी जनतेला सांगावे, असे परखड मत बर्डे यांनी व्यक्त केले.

दुसरी बाब म्हणजे, पत्रादेवी नाक्यावर कार्यरत असणाऱ्या गोवा पोलिसांकडे आवश्यक आधुनिक साधनसुविधा नाहीत, त्यांना बसण्यासाठी योग्य जागाही नाही. साध्या पत्र्याच्या शेडमध्ये हे पोलीस कर्मचारी बसतात. जर अश्याच शेडमध्ये मंत्री आमदारांना बसवले तर चालेल का? त्यामुळे याकडे मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी बर्डेंनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

Fact Check: गोव्यात बोट पलटी होऊन 23 लोकांचा मृत्यू, 64 बेपत्ता; व्हायरल व्हिडिओ मागील सत्य काय?

Tourist in Goa: गोव्यात धार्मिक तणाव, पर्यटकांची पायपीट तर शाळकरी मुलांचे हाल!!

गोव्यातील पोर्तुगीजकालीन पूलांचे होणार 'स्ट्रक्चरल ऑडिट'; सावंत सरकारचा निर्णय

Goa Government Schools: ...गेल्या 5 वर्षांत ट्रेंड बदलला, शासनाचे सरकारी शाळांना प्राधान्य; CM सावंत

SCROLL FOR NEXT