Goa Updates: पेडण्यातील कलाकारांसाठी आरोलकरांची महत्वाची घोषणा

Goa Breaking News 21 November 2023: पणजी, म्हापसा, मडगाव तसेच राज्यातील महत्वाच्या ब्रेकिंग न्यूज
Goa Live Updates 21 November 2023 | 54th IFFI Goa | Goa Breaking News
Goa Live Updates 21 November 2023 | 54th IFFI Goa | Goa Breaking NewsDainik Gomantak
Published on
Updated on

पेडण्यातील कलाकारांसाठी आरोलकरांची महत्वाची घोषणा,

मांद्रे मतदार संघातील पर्यायाने पेडणे तालुक्यातील जनतेसाठी कलाकारांसाठी लवकरच मांद्रे मतदारसंघात कला भवन उभारण्यात येणार आहे.

याशिवाय मांद्रे उदरत संस्थेअंतर्गत ज्या पद्धतीने दीपोत्सव मोठ्या उत्साहात यशस्वी करून दाखवला त्याच सारखा नाताळ उत्सवही सार्वजनिक पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे.

तसेच जानेवारी महिन्यामध्ये पेडणे तालुक्यासाठी युवा महोत्सवाचे आयोजन मांद्रे उदरगत संस्थेअंतर्गत केले जाईल, अशी माहिती मांद्रे मतदारसंघाचे आमदार जीत आरोलकर यांनी दिलीय.

इफ्फीतील आभासी दुनियेतील काही अविष्कार पहाच..

गोव्यात सुरु असलेल्या भारताच्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जगभरातील सिनेमांची मेजवानी सिने रसिकांसाठी खुली झाली आहे. विविध विभागात सुमारे २७० हून अधिक चित्रपट पाहण्याची संधी रसिकांना मिळणार आहे.

इफ्फीच्या काळात सिने-मेला, फिल्म बाझार यासह विविध उपक्रमांची रेलचेल याठिकाणी पाहायला मिळते. दरम्यान, यावेळी इफ्फीत मोदी सरकारच्या योजनांचे आभासी वास्तव तंत्रज्ञानाचा वापर करुन सेल्फी पॉईंट उभारण्यात आले आहेत.

युवा पोलिस कॉन्स्टेबलची राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या

फोंडा तालुक्यातील बेताळभाट-सावईवेरे येथील योगेश्‍‍वर सुरेश सावंत या ३६ वर्षीय युवा पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्‍याचा धक्कादायक प्रकार आज मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

पोलिस खात्याच्या भारतीय राखीव दलात (आयआरबी) रायबंदर स्थानकात तो सेवा बजावत होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे समजते.

ऋत्विज परब ब्लिट्झ बुद्धिबळात विजेता! अपराजित कामगिरी

ऋत्विज परब याने अपराजित कामगिरीसह ११ फेऱ्यांतून साडेदहा गुणांची कमाई करताना श्रीमती सुनंदाबाई दयानंद बांदोडकर स्मृती मानांकन ब्लिट्झ बुद्धिबळ स्पर्धेत विजेतेपद पटकावले. तिसवाडी तालुका बुद्धिबळ संघटनेतर्फे घेण्यात आलेली स्पर्धा पणजीतील गोमंतक मराठा समाजाच्या राजाराम स्मृती सभागृहात झाली.

धक्कादायक! बेताळभाट-सावईवेरेतील पोलीस कॉन्स्टेबलची आत्‍महत्‍या

फोंडा तालुक्यातील बेताळभाट-सावईवेरे येथील योगेश्‍‍वर सुरेश सावंत या ३६ वर्षीय युवा पोलिस कॉन्स्टेबलने आपल्या राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या करण्‍याचा धक्कादायक प्रकार आज मंगळवारी सकाळी उघडकीस आला.

पोलिस खात्याच्या भारतीय राखीव दलात (आयआरबी) रायबंदर स्थानकात तो सेवा बजावत होता. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. परंतु गेल्या काही दिवसांपासून तो मानसिक तणावाखाली असल्याचे समजते.

लाडक्या भाचीसाठी सलमान खान अवतरला इफ्फीच्या रेड कार्पेटवर

बॉलिवूड अभिनेता भाईजान सलमान खानने मंगळवारी इफ्फीच्या रेड कार्पेटवर ग्रॅन्ड एन्ट्री घेतली. गोव्यात सुरु असलेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा आज दुसरा दिवस असून, सायंकाळी साडे पाचच्या सुमारास सलमान रेड कार्पेटवर दाखल झाला.

salman khan
salman khandainik gomantak

सलमान खानची मुख्यमंत्र्यांच्या महालक्ष्मी निवासस्थानी एन्ट्री

गोव्याच्या महिलांचा फुटबॉलमध्ये पराभव

गोव्याच्या महिलांना २८व्या राष्ट्रीय सीनियर महिला फुटबॉल स्पर्धेत पराभवाचा सामना करावा लागला. यजमान ओडिशाने त्यांच्यावर २-० फरकाने मात केली. सामना सुंदरगड येथे झाला. स्पर्धेतील पहिल्या सामन्यात गोव्याने मेघालयाला ४-१ फरकाने नमविले होते.

...आणि नाचता नाचता शाहिद कपूर स्टेजवरुन कोसळला, पाहा व्हिडिओ

चित्रपट महोत्सवाचा मुख्य उद्घाटन समारंभ पार पडल्यानंतर विविध कलाकारांनी नृत्य सादरीकरण केले. धकधक गर्ल माधुरी दीक्षितसह शाहिद कपूर देखील विविध गाण्यांवर यावेळी धिरकला.

दरम्यान, एका गाण्यासाठी नृत्य सादरीकरण करताना शाहिद नाचत नाचत स्टेच्या कडेला आला. स्टेजचा अंदाज न आल्याने त्याचा पाय निसटला आणि तो खाली कोसळला.

आझाद आवाजे कैद नही होती! इफ्फीमध्ये सारा अली खानच्या चित्रपटाचे मोशन पोस्टर रिलीज

एसटी समुदायासाठी काहीजण उगाच ओरड करताहेत. सरकारने आधीच स्पष्ट केले आहे की आरक्षण 2027 पर्यंत दिले जाईल. पण यांना आरक्षण आत्ताच हवे आहे. आगामी काही दिवसात आम्ही केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटणार आहोत.

- रमेश तवडकर, सभापती, गोवा विधानसभा

वाळवंटी नदीत रंगणार 'नौकानयन' स्पर्धा

विठ्ठलापूर-साखळी येथे वाळवंटी नदीत रविवारी (ता.26) रंगणार राज्यस्तरीय 'नौकानयन' स्पर्धा. त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त कला आणि संस्कृती, पर्यटन तसेच माहिती आणि प्रसिद्धी खात्यांच्या सहकार्याने विठ्ठलापूर दीपावली समिती आणि श्री विठ्ठल देवस्थानतर्फे आयोजन. आमदार प्रेमेंद्र शेट यांची पत्रकार परिषदेत माहिती.

हिवाळी अधिवेशन जानेवारीमध्ये

गोवा विधानसभेचे हिवाळी अधिवेशन जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार. सभापती रमेश तवडकर यांची माहिती.

'या' दिवशीपासून सुरू होणार शिवमोग्गा-गोवा फ्लाईट; उडान योजनेंतर्गत स्टार एअर देणार सेवा

कर्नाटकातील शिवमोग्गा विमानतळावरून गोव्याला जोडणारी विमानसेवा 21 नोव्हेंबरपासून सुरू करण्यात येत आहे. याशिवाय शिवमोग्गा ते हैदराबाद आणि शिवमोग्गा ते तिरूपती या फ्लाईट्सनाही सुरवात होणार आहे.

UDAN-RCS योजनेंतर्गत मंजूर केलेले तीन मार्ग स्टार एअरतर्फे चालवले जात आहेत. 31 ऑगस्टपासून इंडिगो एअरलाइन्स बेंगळुरू-शिवमोग्गा मार्गावर कार्यरत आहेत.

स्टार एअरने आणखी तीन मार्ग सुरू केल्यामुळे, शिवमोग्गा विमानतळावरून आता बेंगळुरू, हैदराबाद, गोवा आणि तिरुपतीला प्रवाशांना जाता येईल.

टॅक्सी स्टॅण्डवर मारहाण; उपचारादरम्यान मृत्यू

शुल्लक बाचाबाचीवरून झालेल्या वादाचे रुपांतर भांडणात होऊन मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या अनिल रामा गुणपत्रे (५६, खोर्ली-म्हापसा) यांचे आज मंगळवारी गोमेकॉत उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा मारहाणीचा प्रकार म्हापसा येथील टॅक्सी स्टॅण्डजवळील रस्त्यावर घडलेला.

आदर्श युवा संघ, गावडोंगरी - खोतीगाव, काणकोण तर्फे ८ ते १० डिसेंबर या तीनदिवशीय काळात आदर्श ग्राम येथे लोकोत्सवाचे आयोजन. पारंपरिक लोकनृत्य व खेळ, वन औषधीचे प्रदर्शन, विविध स्पर्धांचे आयोजन. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उदघाटन व ६ राज्यांचे सभापती या लोकोत्सवाला लावणार उपस्थिती. संघाचे संस्थापक व राज्याचे सभापती रमेश तवडकर यांची माहिती.

एनएफडिसीच्या क्रिएटिव्ह माईंडस ऑफ टुमारो दालनाचे केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. परंतु दालनात दिव्यागांना जाण्यासाठी मार्ग न असल्याने दिव्यांगास दालनाबाहेर थांबावे लागले .

creative minds tomorrow
creative minds tomorrowDainik Gomantak

धक्कादायक! 19 वर्षीय विद्यार्थिनीचा बस कंडक्टरने केला विनयभंग; मुलगी अल्पवयीन असल्यापासून करत होता छळ

गोव्यात बसमधून प्रवास करत असताना एका 19 वर्षीय महाविद्यालयीन विद्यार्थिनीचा विनयभंग केल्याप्रकरणी बस कंडक्टरला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी मंगळवारी ही माहिती दिली. हा बस कंडक्टर 20 वर्षांचा आहे.

संबंधित विद्यार्थिनी बसमध्ये चढली की ती उतरेपर्यंत हा कंडक्टर तिच्याकडे पाहत राहायचा. तिला लज्जा निर्माण होईल, असे वर्तन त्याने केल्याचे सांगितले जात आहे.

या मुलीला शिक्षणासाठी याच बसने जावे लागायचे आणि या बसमध्ये संबंधित कंडक्टर गेल्या वर्षभरापासून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता. वारंवारच्या त्रासाला संबंधित विद्यार्थिनी कंटाळली होती.

सोमवारी कंडक्टरने तिचा विनयभंग केल्यानंतर विद्यार्थिनीने पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानुसार कंडक्टरवर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांचा मडगाव पालिकेवर मोर्चा; बाबू आजगावकरांचा प्रवेशद्वारावर ठिय्या...

 मडगाव येथील गांधी मार्केटमधील व्यापाऱ्यांनी आज, मंगळवारी मडगाव पालिकेवर मोर्चा काढला. यावेळी मुख्याधिकारी आणि नगराध्यक्ष अनुपस्थित होते. त्यामुळे चिडलेल्या व्यापाऱ्यांनी माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या सह प्रवेशद्वारावरच ठिय्या मांडला.

पर्यटन हंगामासाठी हडफडे सॅटर्डे नाईट मार्केट सजले! पर्यटकांची मोठी गर्दी

कळंगुट, देशी-विदेशी पर्यटकांचे आकर्षण असलेले हडफडे येथील सॅटर्डे नाईट मार्केट येत्या पर्यटन हंगामासाठी सजले आहे. शनिवार (ता.१८)पासून येथील प्रसिद्ध बाजाराला दिमाखात सुरवात झाली.

दरम्यान, सलीम्स सॅटर्डे नाईट मार्केट म्हणून परिचित असलेल्या येथील बाजाराचा आठवड्याच्या दर शनिवारी हजारोंच्या संख्येने देशी तसेच विदेशी पर्यटक आनंद घेत असतात.

भरधाव वाहनाच्या धडकेत गाईसह 4 वासरांचा मृत्यू; पांजरखणी कुंकळी येथे पहाटे अपघात

मडगाव-काणकोण महामार्गावर पांजरखणी कुंकळी येथे झालेल्या अपघातात एका गाईसह चार वासरांचा मृत्यू झाला आहे. आज मंगळवारी पहाटे ही बाब लक्षात आली. अज्ञात वाहनाने या जनावरांना धडक दिल्याचे दिसते.

ही भटकी जनावरे आहेत. त्यांच्यावर अद्याप तरी कुणीही मालकी सांगितलेली नाही. मंगळवारी पहाटे ही जनावरे रस्त्यावरच मृतावस्थेत पडून होती. सकाळी स्थानिक नागरिकांनी ती रस्त्याच्या बाजूला आणली.

'इफ्फी'मध्ये आज मंगळवारी कुठे, काय? जाणून घ्या; 'मास्टरक्लास'मध्ये करन, सारा, झोया, सनी देओल

आयनॉक्स पणजी

सकाळी ९ ---- यान्निक ------ आयनॉक्स स्क्रीन १

सकाळी ९.१५ ---- बिम -------- आयनॉक्स स्क्रीन ३

सकाळी ९.३०---- अँड द किंग सेड, व्हाट अ फँटॅस्टिक... --- आयनॉक्स स्क्रीन ४

सकाळी ११.१५ ---- युरेका --- आयनॉक्स स्क्रीन १

सकाळी ११.४५ ---- रूम ९९९ ---- आयनॉक्स स्क्रीन ३

सकाळी ११.४५ ---- अँड्रो ड्रीम्स/ अट्टम ------- आयनॉक्स स्क्रीन २

दुपारी १२ ---- ३ लिटल किंगपू गोट्स ----- आयनॉक्स स्क्रीन ४

दुपारी २ ----- गदर २ ----- अशोका ऑडी

दुपारी २.३० ---- मोरो ----आयनॉक्स स्क्रीन १

दुपारी ३ ---- डिग्निटी ---- आयनॉस्क स्क्रीन ४

दुपारी ३.३० ----- बेला अमेरिका ---- आयनॉक्स स्क्रीन ३

सायं. ५ ---- फर्रे ---- आयनॉक्स स्क्रीन १

सायं. ६ ---- जायंट्स ऑफ इस्टर आयलँड ---- आयनॉस्क स्क्रीन ४

सायं. ६.१५ ---- गांधी टॉक्स ---- आयनॉक्स स्क्रीन ३

रात्री ८.१५ ---- व्हेन द सीडिंग्ज ग्रो ---- आयनॉक्स स्क्रीन ४

रात्री ८.३० ---- स्क्रॅपर ---- आयनॉक्स स्क्रीन १

रात्री ९---- असोग ---- आयनॉक्स स्क्रीन ३

रात्री १०.३० ----- वन्स विदिन अ टाईम ----- आयनॉक्स स्क्रीन १

कला अकादमी

सकाळी ११ ---- इन कॉन्व्हर्सेशन - ए वतन मेरे वतन - सारा अली खान, करन जोहर

दुपारी २.३० ---- इन कॉन्व्हर्सेशन - द आर्चीज - मेड इन इंडिया - झोया अख्तर, रीमा कागती, जॉन गोल्डवॉटर, शरद देव राजन, रुचिका कपूर

सायं. ५ ---- इन कॉन्व्हर्सेशन - नो इफ नो बट ओनली जट्ट --- सनी देओल

मॅक्विनेझ पॅलेस

सकाळी ९ ---- सॅम्युएल अँड द लाईट ----- मॅक्विनेझ पॅलेस १

सकाळी १०.४५ ---- द प्राईझ ----- मॅक्विनेझ पॅलेस - १

दुपारी १ ------ रिटर्न ऑफ द जंगल ---- मॅक्विनेझ पॅलेस १

दुपारी ३.१५ ------ गांधी अँड कंपनी ----- मॅक्विनेझ पॅलेस १

सायं. ५.३० ---- मायटी आफरीन : इन द टाईम ऑफ फ्लड्स ---- मॅक्विनेझ पॅलेस १

सायं. ७.३० ---- लुबो ---- मॅक्विनेझ पॅलेस १

ओपन एअर स्क्रीनिंग

मिरामार बीच

सायं. ७ ---- भारत है हम - एपिसोड १

सायं. ७.२० ---- मेजर

हणजुणे (Anjuna) बीच

सायं. ७ ---- भारत है हम - एपिसोड २

सायं. ७.२० ---- ईटी द एक्स्ट्रा टेरेस्ट्रियल

रविंद्र भवन, मडगाव

सायं. ७ ----- भारत है हम - एपिसोड ३

सायं. ७.२० ----- बटरफ्लाय

आयनॉक्स पर्वरी

दुपारी १---- अ गोल्डन लाईफ ---- आयनॉक्स स्क्रीन १ पर्वरी

दुपारी १.१५ ----- व्हेटफील्ड ----- आयनॉक्स स्क्रीन २ पर्वरी

दुपारी १.३० ----- एक्स्ट्रा लेसन --- आयनॉक्स स्क्रीन ३ पर्वरी

दुपारी १.४५ ----- शेम ऑन ड्राय लँड ----- आयनॉक्स स्क्रीन ४ पर्वरी

दुपारी ४ ---- डॉरेन्स वेडिंग ---- आयनॉक्स स्क्रीन १ पर्वरी

दुपारी ४.१५ ----- एडिऑस ब्यूनॉस आयरस ---- आयनॉक्स स्क्रीन २ पर्वरी

दुपारी ४.३० ---- फ्लेमिंग क्लाऊड ---- आयनॉक्स स्क्रीन ३ पर्वरी

दुपारी ४.४५ ---- अडेन्ट्रो ---- आयनॉक्स स्क्रीन ४ पर्वरी

सायं. ७ ---- वाईल्ड ---- आयनॉक्स स्क्रीन १ पर्वरी

सायं. ७.१५ ---- वेक मी ---- आयनॉक्स स्क्रीन २ पर्वरी

सायं. ७.३० ---- अंटार्क्टिका कॉलिंग ---- आयनॉक्स स्क्रीन ३ पर्वरी

रात्री ७.४५ ----- डान्सिंग ऑन द एज ऑफ अ व्होल्कॅनो ---- आयनॉक्स स्क्रीन ४ पर्वरी

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com