Maharashtra Minister Nilesh Rane Dainik Gomnatak
गोवा

Illegal Fishing: जप्त केलेल्या गोव्याच्या त्या 2 ट्रॉलर्सचा ताबा महाराष्ट्राकडेच! 'एलईडी मासेमारी' खपवून घेणार नाही, मंत्री नितेश राणेंची कडक भूमिका

Maharashtra Illegal Fishing: महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत एलईडी मासेमारी उपकरणांचा वापर करून मासेमारी केल्याप्रकरणी गोव्यातील दोन ट्रॉलर्सवर मोठी कारवाई करण्यात आली आहे.

Sameer Amunekar

महाराष्ट्राच्या सागरी हद्दीत एलईडी मासेमारी उपकरणांचा वापर करून मासेमारी केल्याप्रकरणी गोव्यातील दोन ट्रॉलर्सवर मोठी कारवाई करण्यात आली. या ट्रॉलर्सना महाराष्ट्राच्या मत्स्यव्यवसाय विभागाच्या अधिकाऱ्यांनी जप्त केले आहेत.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने एलईडी मासेमारीविरुद्ध कठोर भूमिका घेतली आहे. राज्याचे मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “एलईडी मासेमारी कोणत्याही परिस्थितीत खपवून घेतली जाणार नाही, जप्त केलेले गोव्यातील ट्रॉलर्स ताब्यातच राहणार” असं नितेश राणे म्हणालेत.

गुरुवारी (ता. २०) करण्यात आलेल्या या कारवाईदरम्यान, संबंधित ट्रॉलर्सने महाराष्ट्राच्या सागरी हद्दीचे उल्लंघन केल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. स्थानिक कायदे आणि मत्स्य व्यवसाय संबंधी नियमांनुसार अशाप्रकारची मासेमारी बेकायदेशीर असून, याविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश पूर्वीपासूनच देण्यात आले होते.

एलईडी लाईटच्या वापरामुळे मोठ्या प्रमाणावर मासे एका ठिकाणी आकर्षित होतात. त्यामुळे नैसर्गिक संतुलन बिघडण्याची आणि सागरी जीवसृष्टीवर गंभीर परिणाम होण्याची शक्यता वाढते. याचा थेट परिणाम स्थानिक मच्छीमारांच्या उपजीविकेवर होत असल्याने या पद्धतीला महाराष्ट्रात पूर्णतः बंदी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Iran US Israel War: 12 दिवसांचा भीषण बॉम्बवर्षाव, तरीही इराणची सत्ता अभेद्य! अमेरिकन गुप्तचर अहवालानं उडवली ट्रम्प- नेत्यान्याहूची झोप

Bhausaheb Bandodkar: लोकांना विलीनीकरण नको होते, पण 'भाऊ' हवे होते! जनमत कौलानंतरही टिकून राहिले भाऊसाहेब बांदोडकरांचे वलय

Train Viral Video: हद्द झाली..! वयाचं भान नसलेल्या 'त्या' व्यक्तीचा रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल, तरुणीनं उडवली झोप; सोशल मीडियावर संतापाची लाट

आंध्र प्रदेशात भेसळयुक्त दुधामुळे 13 जणांचा मृत्यू, अजून 7 जण देतायेत मृत्यूशी झुंज; एकाच डेअरीतून दूध घेणाऱ्या 106 कुटुंबांना विषबाधा

PM Kisan 22th installment: प्रतीक्षा संपली! उद्या देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार पीएम-किसानचा 22वा हप्ता

SCROLL FOR NEXT