Loksabha Election 2024  Dainik Gomantak
गोवा

Loksabha Election 2024 : ‘कॅथाेलिक’ काँग्रेससोबत? दीड लाख मते अल्‍पसंख्‍याकांची

गोमन्तक डिजिटल टीम

Loksabha Election 2024 :

मडगाव, दक्षिण गोव्‍यातील एकूण साडेपाच लाख मतदारांपैकी दीड लाख मते ही अल्‍पसंख्‍याक कॅथाेलिक समाजाची असून आतापर्यंत परंपरेने ही मते काँग्रेसलाच पडत आलेली आहेत.

मात्र, यावेळी दक्षिण गोव्‍यात ‘आरजी’सारखा पक्ष रिंगणात असल्‍याने आणि भाजपात कॅथोलिक मंत्री असल्‍याने हा मतदार काँग्रेसच्‍या पाठीमागे खंबीरपणे उभा राहणार का? हा प्रश्‍न विचारला जात असून याच प्रश्‍नाच्‍या उत्तरावर दक्षिण गोव्‍याचा निकाल कुणाच्‍या बाजूने हे स्‍पष्‍ट होणार आहे.

मुरगाव तालुक्‍यातील चारपैकी एक आणि सासष्‍टी तालुक्‍यातील आठपैकी सहा मतदारसंघ ख्रिस्‍ती मतदारांची संख्‍या मोठ्या प्रमाणावर असणारे आहेत. मात्र, सासष्‍टीतील या सहा मतदारसंघांपैकी नुवे व नावेली या दोन मतदारसंघांत भाजपचे तर कुडतरी या एका मतदारसंघात भाजपला पाठिंबा देणारा आमदार आहे.

मुरगाव तालुक्‍यातील कुठ्ठाळी हा मतदारसंघ ख्रिस्‍तीबहुल मतदारसंघ असला तरी याही मतदारसंघातील अपक्ष आमदार आंताेन वाझ यांनी भाजप सरकारला पाठिंबा दिलेला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर काँग्रेस आपली ही पारंपरिक मते राखू शकेल का? हा प्रश्‍न चर्चेत येऊ लागला आहे.

राजकीय विश्‍लेषक ॲड. राधाराव ग्रासियस यांना यासंदर्भात विचारले असता, सगळीच ख्रिस्‍ती मते काँग्रेसलाच पडतील असे म्‍हणणे याेग्‍य होणार नाही.

भाजपबरोबर असलेले आमदार काही ख्रिस्‍ती मते आपल्‍याबरोबर ओढून घेऊ शकतील. काही प्रमाणात ‘आरजी’ पक्षही ख्रिस्‍ती मते घेऊ शकेल. असे जरी असले तरी हे प्रमाण नगण्‍य असण्‍याची शक्‍यता आहे. बहुतेक ख्रिस्‍ती मते काँग्रेसच्‍याच बाजूने राहतील, असे सध्‍या तरी वाटते, अशी प्रतिक्रिया त्‍यांनी व्‍यक्‍त केली.

मडगावचे माजी नगराध्‍यक्ष आणि ख्रिस्‍ती समाजात नाव असलेले स्‍थानिक राजकीय नेते एलिन कुलासो यांना विचारले असता, बहुतेक ख्रिस्‍ती लोक काँग्रेसच्‍याच बाजूने मतदान करतील ही जरी गोष्‍ट खरी असली तरी यावेळी पल्‍लवी धेंपे या भाजपच्‍या उमेदवार आहेत आणि त्‍यांच्‍या कुटुंबीयांकडून चालविल्‍या जाणाऱ्या धेंपो स्‍पोर्ट्‌स क्‍लबचा कित्‍येक ख्रिस्‍ती खेळाडू आणि संघटकांशी संबंध असल्‍याने ती मते भाजपच्‍या बाजूने जाऊ शकतात, असे ते म्‍हणाले.

काही वर्षांपूर्वी डॉ. विल्‍फ्रेड मिस्‍किता यांना भाजपने दक्षिण गोव्‍यातून लोकसभेची उमेदवारी दिली हाेती त्‍यावेळी कित्‍येक ख्रिस्‍ती लोकांनी मिस्‍किता यांना मतदान केले होते, याकडे त्‍यांनी लक्ष वेधले.

भाजप हा कडवा जातीयवादी पक्ष असून या पक्षाचा आजवरचा इतिहास पाहिल्‍यास त्‍यांनी अल्‍पसंख्‍याक समाजाला पाशवीरीत्‍या चिरडून टाकण्‍याचाच प्रयत्‍न केला आहे. आपल्‍या राजकीय फायद्यासाठी हा पक्ष कुठल्‍याही थराला जाऊ शकतो. यासाठी सर्व मतदारांनी भाजपच्‍या विरोधात मतदान करावे, असेच मला वाटते.

- डॉ. फ्रान्‍सिस कुलासो, ख्रिस्‍ती नेते

भाजप हा अल्‍पसंख्‍याकविरोधी पक्ष असे म्‍हणणे चुकीचे आहे. गोव्‍यात भाजपने अल्‍पसंख्‍याकांच्‍या विरोधात कुठलेही कृत्‍य केलेले नाही. उलट या समाजाला भाजपकडून मदतच मिळाली आहे. त्‍यामुळे ख्रिस्‍ती मतदार भाजपच्‍या जवळ येऊ लागला आहे. केंद्र सरकारच्‍या मदतीने जी विकासकामे केली आहेत ती अल्‍पसंख्‍याकांना दिसतात.

- अँथनी बार्बोझा, भाजप एसटी माेर्चा उपाध्‍यक्ष

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rashi Bhavishya 18 October 2024: उत्तम द्रव्यलाभ होईल, व्यावसायिकांसाठी आजचा दिवस आशादायी

Ponda: बहिणीने धाडस केले पण भाऊ बचावला नाही; 17 तासानंतर आढळला दर्शन नार्वेकरचा मृतदेह

मेरशीत एक महिन्यापासून उभ्या जीपमध्ये आढळला मृतदेह, परिसरात खळबळ; गोव्यातील ठळक बातम्या

Goa Belgaum Highway: गोवा-बेळगाव महामार्गावरील वाहतूक ठप्प, दोन्ही बाजूला 4-5 किलोमीटर लांब वाहनांच्या रांगा

Divar Island: पाचव्या शतकातील निर्मिती प्रक्रिया वापरुन गोव्यात उभारलं जातंय जहाज; पुढल्या वर्षी करणार गुजरात ते मस्कत प्रवास

SCROLL FOR NEXT