Arambol Murder Case Dainik Goamantak
गोवा

Arambol Murder Case: गोव्यात शॅकवर आणखी एक खून, महिन्याभरात दुसरी घटना; खुर्च्या हटवल्या म्हणून स्थानिकाचा घेतला बळी

Goa Murder Case: शॅक कर्मचारी आणि अमर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. व पुढे या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले.

Pramod Yadav

Arambol Murder Case

मांद्रे: नव्या वर्षाचा महिना अद्याप पूर्ण व्हायचा असताना गोव्यात शॅकवर खूनाची दुसरी घटना उघडकीस आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे केवळ खुर्च्या हटवल्या म्हणून शॅकवरील कर्मचाऱ्यांनी स्थानिकाला जीवे ठार केले. मृत युवक स्थानिक असून, २६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तो समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आला असता ही घटना घडली.

अमर बांदेकर (वय ३७) असे मृत युवकाचे नाव आहे. अमर २६ जानेवारी रोजी सायंकाळच्या सुमारास तो हरमल समुद्रकिनाऱ्यावर फेरफटका मारण्यासाठी आला होता. दरम्यान, किनाऱ्यावर असलेल्या दोन खुर्च्या अडथळा ठरत असल्याने त्याने हटवल्या.

खुर्च्या हटवल्यामुळे शॅक कर्माचारी संतापला व त्याने अमरला जाब विचारला. खुर्च्या अडथळा ठरत असल्यामुळे हटवल्याचे अमर सांगितले. पण, यावरुन शॅक कर्मचारी आणि अमर यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. व पुढे या वादाचे पर्यावसान मारामारीत झाले.

शॅक कर्माचाऱ्यानी केलेल्या माराहाणीत अमर गंभीर जखमी झाला. अमरला उपचारासाठी नजीकच्या रुग्णालयात घेऊन जात असताना त्याचा मृत्यू झाला. मांद्रे पोलिसांनी याप्रकरणी एका शॅक कर्मचाऱ्याला अटक केली असून, पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे.

या घटनेमुळे हरमल ग्रामस्थ चांगलेच आक्रमक झाले व त्यांनी अमरचा मृतदेह ताब्यात घेण्यात नकार दिला. आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा स्थानिकांनी घेतल्याने काहीकाळ परिसरात तणाव निर्माण झाला होता. मांद्रे पोलिस अधिक तपास करत आहेत.

नव्या वर्षाच्या तोंडावर कळंगुट येथे शॅकवर झाला होता खून

नव्या वर्षाचे स्वागत करण्यासाठी मित्रांसोबत गोव्यात आलेल्या बोल्लारवि तेजा या तरुणाचा कळंगुट येथे शॅकवर खून झाल्याची घटना ३१ डिसेंबर उत्तररात्री दोनच्या सुमारास घडली होती.

याप्रकरणी शॅक मालक, त्याचा मुलगा आणि तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली. या घटनेला एक महिना पूर्ण व्हायचा असतानाच आता दुसऱ्या एका घटनेत शॅकवर युवकाचा खून केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pakistan Cricket Team: पाकिस्तान संघात पुन्हा एकदा मोठा फेरबदल! सलमान आगाची कॅप्टन्सी जाणार; 'या' खेळाडूकडे सोपवली जाणार संघाची कमान

Shani Gochar 2026: मोठ्या व्यावसायिक डील अन् पदोन्नतीचा योग! 9 ऑक्टोबरपासून उजळणार 5 राशींचं नशीब; शनीचं नक्षत्र परिवर्तन ठरणार वरदान

Viral Post: सकाळी ऑफिसमध्ये वेलकम, तर दुपारी थेट नोकरीवरून काढलं; जॉइनिंगच्या अवघ्या 4 तासांत महिलेसोबत नेमकं काय घडलं? पोस्ट व्हायरल

सनरूफ, 360-डिग्री कॅमेरा, 10.25 इंच स्क्रीन... Maruti Dzireला टक्कर देण्यासाठी येतेय Tataची नवी Aeris; शुक्रवारी होणार लॉन्च

Asian Games 2026: Chak De India! वादळी खेळाच्या जोरावर भारतानं दक्षिण कोरियाला 8-2 ने लोळवलं; सेमीफायनलचं तिकीट जवळपास पक्कं

SCROLL FOR NEXT