Calangute Murder: गोव्यात वर्षाचा शेवटही रक्तरंजित; कळंगुटमध्ये आंध्र प्रदेशच्या पर्यटकाचा खून

Goa Murder Case: कळंगुट येथील शॅकमध्ये आंध्र प्रदेशच्या तरुण पर्यटकाचा खून झाल्याची घटना उघडकीस आली आहे.
Calangute Murder: गोव्यात वर्षाचा शेवटही रक्तरंजित; कळंगुटमध्ये आंध्र प्रदेशच्या तरुण पर्यटकाचा खून
Goa Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Calangute Murder Case

म्हापसा: गोव्यात २०२४ या वर्षाची सुरुवात सूचना शेठ या महिलेने पोटच्या मुलाचा खून केल्याच्या घटनेने झाली. दरम्यान, वर्षाचा शेवटही कळंगुटमध्ये पर्यटकाच्या खूनाने झाली आहे. आंध्र प्रदेशच्या २८ वर्षीय तरुणाचा कळंगुट येथील शॅकमध्ये खून झाल्याचा प्रकार मंगळवारी उत्तररात्री दोनच्या सुमारास उघडकीस आला आहे.

भोलारवि तेजा (२८, रा. आंध्र प्रदेश) असे खून झालेल्या पर्यटकाचे नाव आहे. याप्रकरणी शॅकमधील तीन कर्मचाऱ्यांना कळंगुट पोलिसांनी अटक केली असून, शॅक मालक फरार असल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मृत भोलारवि त्याच्या काही मित्रांसोबत शॅकमध्ये जेवण करण्यासाठी गेले होते. शॅक बंद झाल्यानंतर देखील त्यांनी काही पदार्थाची मागणी केली. पण, शॅक बंद झाल्याने पदार्थ देण्यास कर्मचाऱ्यांनी नकार दिला. यावरुन पर्यटक आणि शॅक कर्मचारी यांच्यात वाद झाला. याचेच रुपांतर हाणामारीत झाले.

Calangute Murder: गोव्यात वर्षाचा शेवटही रक्तरंजित; कळंगुटमध्ये आंध्र प्रदेशच्या तरुण पर्यटकाचा खून
Ponda Job Alert: फोंडा पालिकेत भरली जाणार विविध पदे! नवीन इमारत, सीसीटीव्हीवरती बैठकीत चर्चा

शॅक मालक आणि तेथील कर्मचाऱ्यांनी पर्यटकांना जबर मारहाण केली. गंभीर जखमी झालेल्या भोलारवि याला कांदोळी येथील रुग्णालयात दाखल केले असता त्याला मृत घोषित करण्यात आले. कळंगुट पोलिस निरीक्षक परेश नाईक यांनी घटनेचा पंचनामा केला. पोलिसांनी तीन कर्मचाऱ्यांना अटक केली असून, शॅक मालक फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस करतायेत.

वर्षाच्या सुरुवातीला सूचना सेठ प्रकरण

बंगळुरु येथील एका स्टार्टअप कंपनीची सीईओ असणारी सूचना सेठ या महिलेने आपल्याच पाच वर्षीय मुलाचा खून केल्याची घटना जानेवारी २०२४ च्या पहिल्या आठवड्यात उघडकीस आली होती. महिलेने मुलाचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून ती फरार होण्याच्या बेतात असताना तिला कर्नाटक येथे अटक करण्यात आली होती.

घटस्फोट झालेल्या सूचनाने पतीसोबत वाद आणि मुलाच्या कस्टडी कोणाला मिळणार या भीतीतून टोकाचा निर्णय घेतल्याचे नंतर उघडकीस आले. सूचना सध्या अटकेत असून, हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com