Ponda police station live wire  Dainik Gomantak
गोवा

तरुणाच्या 'त्या' कृतीने उडवली प्रशासनाची झोप, फोंडा पोलिस स्टेशनसमोर लटकणाऱ्या विजेच्या धोकादायक तारेमुळे संताप

Ponda Electricity Department Issue: फोंडा पोलिस स्टेशनसमोर जवळपास तीन आठवड्यांपासून (20-22 दिवस) एक विजेची तार धोकादायकपणे लटकत असल्याचे वृत्त समोर आले आहे.

Manish Jadhav

फोंडा: फोंडा पोलिस स्टेशनसमोर जवळपास तीन आठवड्यांपासून (20-22 दिवस) एक विजेची तार धोकादायकपणे लटकत असल्याचे वृत्त समोर आले आहे. इतक्या गंभीर सुरक्षेच्या धोक्याकडे स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून दुर्लक्ष झाल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या निष्काळजीपणामुळे जनतेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

दरम्यान, या धोकादायक स्थितीकडे दुर्लक्ष केले जात असतानाच नुकत्याच घडलेल्या एका अस्वस्थ करणाऱ्या घटनेने वातावरण अधिकच गंभीर बनले. एका व्यक्तीने पोलिस स्टेशनच्या बाहेर लटकणाऱ्या विजेच्या तारेला स्वतःच्या गळ्याभोवती गुंडाळण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या या घटनेने उपस्थित नागरिकांमध्ये गोंधळ उडवला आणि काही काळासाठी भीतीचे वातावरण निर्माण झाले.

घटनास्थळी जमलेल्या नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करुन सदर व्यक्तीला रोखले, मात्र या प्रकारामुळे स्थानिक प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पोलिस स्टेशनसारख्या अतिमहत्त्वाच्या ठिकाणी जर 20 दिवसांपेक्षा अधिक काळ धोकादायक स्थिती कायम राहू शकते, तर सामान्य ठिकाणांची काय अवस्था?" असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, याप्रकरणी स्थानिकांनी वीज खात्याकडे तक्रार दिली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. पोलिस (Police) आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या या दुर्लक्षामुळे स्थानिकांमध्ये असंतोष आहे. नागरिकांनी या धोकादायक स्थितीकडे तात्काळ लक्ष देण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची मागणी केली आहे. संपूर्ण प्रकरणाकडे प्रशासन गांभीर्याने पाहते का? दोषींवर कारवाई होते का? हे पाहणे महत्त्वाचे ठरेल. दरम्यान, अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर संतप्त नागरिकांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ST Reservation Bill Passed: गोव्यातील एसटी समाजासाठी आनंदाची बातमी; राजकीय आरक्षण देणारे विधेयक लोकसभेत मंजूर

ST Reservation Goa: 'काँग्रेसमुळे रखडले एसटी समाजाचे राजकीय आरक्षण'; सत्ताधारी - विरोधकांची सभागृहात खडाजंगी

Goa Assembly Live: माजी राज्यपाल स्व. सत्यपाल मलिक यांना विधानसभेत श्रद्धांजली

Raksha Bandhan 2025: लहान भावाला द्या अशा भेटवस्तू, जे पाहून त्याच्या चेहऱ्यावर येईल हसू; पाहा Gift Ideas

Satyapal Malik Death: गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन, ७९ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

SCROLL FOR NEXT