Jasprit Bumrah
Jasprit Bumrah Dainik Gomantak

Jasprit Bumrah: "कॅप्टनला फक्त त्याचाच भरवसा वाटतो"! बुमराहचे दिग्गज खेळाडूने केले कौतुक; म्हणाला, 'इतके सातत्य कुणाकडेच नाही'

Jasprit Bumrah Consistency: फलंदाजांचे वर्चस्व असलेल्या या लढतीत मात्र चर्चा होती वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या नावाचीच. अक्षरने हॅरी ब्रुकचा पकडलेल्या झेलाचेही याप्रसंगी कौतुक करण्यात आले.
Published on

अहमदाबाद: भारत-इंग्लंड यांच्यामधील टी-२० विश्‍वकरंडकातील उपांत्य लढत मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगली. या लढतीसाठी स्टेडियममध्ये उपस्थित असलेल्या क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाखाणण्याजोगा होता. या लढतीत ४९९ धावांचा पाऊस पाडला. फलंदाजांचे वर्चस्व असलेल्या या लढतीत मात्र चर्चा होती वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराच्या नावाचीच. अक्षर पटेलने हॅरी ब्रुकचा पकडलेल्या झेलाचेही याप्रसंगी कौतुक करण्यात आले.

भारत-इंग्लंड रंगलेल्या सामन्याची धुंदी क्रिकेटप्रेमींच्या डोक्यातून अजून उतरलेली नाही. वानखेडे स्टेडियमवरील सामन्यांमध्ये रंग भरले ते खेळाडूंच्या कामगिरीने तसेच मुंबईकर रसिक प्रेक्षकांच्या उत्साहाने. इंग्लंड विरुद्धच्या सामन्यादरम्यान काही काळ नॉर्थ स्टँडला जायची संधी मिळाली. त्या स्टँडचे प्रेक्षक ज्या पद्धतीने क्रिकेट सामन्याचा आनंद घेतात ते बघून मन भरून आले.

अक्षर पटेलने विल जॅक्सचा अशक्यप्राय झेल पकडला तेव्हा याच नॉर्थ स्टँडचे प्रेक्षक ‘बापू मेरी जान... मैं तुझपे कुरबान.... मैं तेरा तू मेरी जाने सारा हिंदुस्तान’ गाणे गायला लागले तेव्हा क्रिकेट सामना बघायची खरी मजा हेच लोक लुटतात हे कळून चुकले. अक्षर पटेलचे टोपण नाव ‘बापू’ असल्याने त्या गाण्याची त्या वेळची हजेरी मजा वाढवून गेली. सामन्याचे समालोचन करणारे तमाम माजी खेळाडू जसप्रीत बुमराचे गुणगान करत होते.

तो चालत येतो मग थोडा पळतो तेव्हा फलंदाजाला चेंडू ७०च्या वेगाने येईल वाटत असते, कारण त्याच्या रन अपमध्ये लय नाही; पण जेव्हा तो चेंडू टाकतो तेव्हा तो ९०च्या वेगाने येतो. गोलंदाजी करताना ज्या जागेवरून जसप्रीत बुमरा चेंडू सोडतो त्या जागेवरून बाकी गोलंदाज चेंडू सोडतात तो थोडा आखूड टप्प्याचा चेंडू असतो.

बुमरा त्याच जागेवरून यॉर्कर टाकायची कमाल करून दाखवतो. वर्षानुवर्षे फलंदाज सरावादरम्यान गोलंदाज कोणत्या जागेवरून चेंडू सोडतो त्यावरून टप्प्याचा अंदाज घेतात. जसप्रीत बुमराच्या बाबतीत तो अंदाज नेहमी चुकतो, अनिल कुंबळे जसप्रीत बुमराच्या गोलंदाजीची खासियत समजावून देताना मला म्हणाला.

Jasprit Bumrah
Ind Vs NZ: अहमदाबादमधील स्टेडियमवर भारतीय संघाचे काय होणार? अक्षर पटेल म्हणाला, 'मै हूं ना..'

भारतीय संघाचे नशीब आहे, की जसप्रीत बुमरा त्यांच्या संघात आहे, या भाषेत महान माजी दक्षिण आफ्रिकन खेळाडू फाफ डुप्लेसीस म्हणाला. त्याच्या चार षटकांची शाश्वती वाटते. तो संघाला गरज असताना चोख कामगिरी करणार हा कप्तानाला भरवसा असतो, यावरून जसप्रीत बुमराची संघातील जागा कळून चुकते. इतके सातत्य इतका भरवसा ना कोणत्या फलंदाजाबद्दल जाणवतो ना कोणत्या गोलंदाजाबद्दल, फाफ डुप्लेसीस पुढे सांगून गेला.

Jasprit Bumrah
Ind Vs Eng: 'भारतीय प्रेक्षकांना शांत करू'! सॅम करनने ओकली आग; वानखेडे मैदान माहिती असल्याने जिंकण्याची अपेक्षा केली व्यक्त

खरे तर सामन्याचा मानकरी जसप्रीतच

सामन्याचा मानकरी ठरवला गेलेला संजू सॅमसन याने प्रामाणिकपणे कबूल केले, की खरे तर हे बक्षीस मला नव्हे तर जसप्रीत बुमराला मिळायला पाहिजे. अक्षर पटेलच्या दोन अफलातून झेलांनी आणि बुमराच्या अचूक चार षटकांच्या माऱ्याने सामना जिंकवला आहे. जसप्रीत बुमरा सध्याच्या क्रिकेटमधला सर्वोत्तम गोलंदाज आहे यात दुमत असायचे कारण नाही, असे संजू सॅमसन म्हणाला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com