Ponda: खडी क्रशर बुडाला पाण्यात! सावर्डे येथील प्रकार; ‘बेकायदा चर खोदून माती रस्त्यावर’

Guddemal Savarde: भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुड्डेमळ येथील ओहळात खडी क्रशर उभारण्यास स्थानिकांचा विरोध होता. या विरोधात स्थानिकांनी ग्रामसभेतही आवाज उठवला होता.
Crusher flooded in Ponda Guddemal Savarde
Crusher flooded in Ponda Guddemal SavardeDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा: गुड्डेमळ, सावर्डे येथे उभारलेल्या खडी क्रशर पाण्यात बुडाला असून पाण्याचा निचरा करण्यासाठी बेकायदा चर खोदून माती रस्त्यावर टाकण्यात आली आहे. या विरोधात स्थानिकांनी आवाज उठवल्यानंतर रस्त्यावरील माती हटवण्यात आली असली तरी पूर्ण रस्ता चिखलमय झाला आहे. दरम्यान, या बेकायदा खडी क्रशर विरोधात कारवाई करावी, अशी मागणी सावर्डेचे काँग्रेस गट अध्यक्ष संकेत भंडारी यांनी केली आहे.

भंडारी यांनी दिलेल्या माहितीनुसार गुड्डेमळ येथील ओहळात खडी क्रशर उभारण्यास स्थानिकांचा विरोध होता. या विरोधात स्थानिकांनी ग्रामसभेतही आवाज उठवला होता. त्यावेळी पंचायतीने कारवाईचे आश्‍वासन दिले होते. परंतु पंचायतीने पुन्हा या प्रकल्पाला सहा महिन्यासाठी तात्पुरता परवाना दिला आहे.

ओहळात उभारलेला हा क्रशर सध्या पाण्यात बुडाला असून तेथील पाण्याचा निचरा करण्यासाठी रस्त्याच्या बाजूने जेसीबी व पोकलीनच्या साहाय्याने बेकायदा ३ ते ४ मीटर रुंद चर खोदला आहे. त्यासाठी शेकडो झाडांची कत्तल केली आहे. तसेच खोदलेल्या चरातील माती रस्त्यावर टाकण्यात आली होती. या विरोधात प्रताप देसाई व स्थानिक नागरिकांनी आवाज उठविल्यानंतर रस्त्यावरील माती हटविली असली तरी रस्ता चिखलमय आहे. नागरिकांचा विरोध असतानाही पंचायतीने या क्रशरला आणखी सहा महिन्यांसाठी दुसऱ्यांदा तात्पुरता परवाना दिला आहे.

कॉंग्रेस नेते गौतम भंडारी यांनी सांगितले की, सध्या हा क्रशर अर्धीअधिक पाण्यात बुडाला आहे. या ठिकाणी सर्व काम बेकायदा सुरू आहे. यात पंचायत, लोकप्रतिनिधी व संबंधित खात्याचे अधिकारी गुंतले आहेत, असा आरोप त्यांनी केला.

गौतम भंडारी यांनी सांगितले की, सावर्डे पंचायत क्षेत्रात असे अनेक खडी क्रशर असून गेली कित्येक वर्षांपासून पंचायतीकडून दिल्या जाणाऱ्या तात्पुरत्या परवान्याच्या आधारावर हे क्रशर बेकायदा चालवले जातात. ओहळात क्ररशला परवाना देणे हा पर्यावरणाशी खेळ आहे, असा दावा त्यांनी केला.

सावर्डेत अनेक बेकायदा क्रशर

संकेत भंडारी यांनी दिलेल्या माहिती नुसार, सावर्डेतील गुढेमळ ते सांतोणपर्यंत अनेक खडी क्रशर तात्पुरत्या परवानाच्या आधारावर वर्षानुवर्षे बेकायदा चालवले जात आहेत. या क्रशरना दर सहा महिन्यांनी पंचायतीकडून तात्पुरता दाखला दिला जातो. मात्र, यातील बहुसंख्य क्रशर मालकांकडे कोणत्याही सरकारी खात्यांचे परवाने त्यांनी मिळवलेले नाहीत.

पोलिसांत तक्रार

दरम्यान, भांडोळ वाघेली येथील प्रताप देसाई यांनी रस्त्यावर माती टाकल्याप्रकरणी कुडचडे पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

न्यायालयात जाणार : संकेत भंडारी

स्वप्नील भंडारी यांनी सांगितले की, या खडी क्रशर प्रकल्पा विरोधात सावर्डे पंचायत तसेच संबंधित खात्यात रीतसर तक्रारी दाखल केल्या आहेत, पण अजून कोणत्याही स्वरूपाची दखल घेतलेली नाही. त्यामुळे आपण या विरोधात न्यायालयात दाद मागणार असे सांगितले.

Crusher flooded in Ponda Guddemal Savarde
Dabolim Accident: गावी जायला निघाला, ट्रकने दिली धडक; चाक अंगावरून गेल्याने बिहारच्या व्यक्तीचा दाबोळीत दुर्दैवी मृत्यू

पाहणी करणार : सरपंच

सावर्डेच्या सरपंच चिन्नमई नाईक यांनी सांगितले की, ओहोळात बुडालेल्या त्या क्रशर मालकाला वर्षभरापूर्वी पंचायतीकडून तात्पुरता दाखला दिला होता. सहा महिन्यांच्या आत त्याला पर्यावरणीय परवान्यासह अन्य खात्यांचे आवश्यक परवाने घेण्यास सांगितले होते. दरम्यान, आपण जेव्हा सुटीवर होते तेव्हा उपसरपंच नीतेश भंडारी यांनी दुसऱ्यांदा सहा महिन्यासाठी तात्पुरता परवाना दिला आहे. दरम्यान, चरातील माती रस्त्यावर टाकण्याच्या प्रकाराची आपण तिथे जाऊन पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Crusher flooded in Ponda Guddemal Savarde
Ro Ro Ferry: सोलर फेरी बंद झाली, रो-रो सेवा सुरु रहावी! चोडण- रायबंदर प्रवाशांची मागणी; 1 जुलैपासून होणार सुरवात

सचिवाकडून दुजोरा

यासंदर्भात पंचायत सचिव सुषमा सावंत देसाई यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी त्या क्रशरला दुसऱ्यांदा तात्पुरता परवाना दिल्याचे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com