License given to five star hotel project in Calangute is illegal Dainik Gomantak
गोवा

कळंगुटमधील हॉटेल प्रकल्पास दिलेला परवाना बेकायदेशीर

गावात धार्मिक तणाव; हॉटेल मान्यता रद्दची मागणी

दैनिक गोमन्तक

शिवोली: गावरावाडा-कळंगुट (Calangute) येथील निर्माणाधिन पंचतारांकीत हॉटेल (Five star hotel) प्रकल्पाला स्थानिक पंचायत मंडळाकडून मासिक बैठकीत ठराव न घेताच परवाना देण्यात आल्याचा आरोप विरोधी गटातील पंच सदस्य गाब्रियल फर्नांडिस, तसेच महिला पंच सदस्य ज्योत्स्ना परुळेकर यांनी केला आहे. दरम्यान, गावरावाड्यातील स्थानिक ख्रिस्ती समाजाच्या धार्मिक भावनांची पर्वा न करता पुरातन कपेलकडे जाणारा रस्ता बेकायदा खोदून गावात तणाव निर्माण केल्याबद्दल येथील प्रकल्पाचा परवानाच तत्काळ रद्द करण्याची मागणी उभयंतांनी सरपंच शॉन मार्टीन्स तसेच पंचायत सचिवांकडे लेखी स्वरूपात केली आहे.

कळंगुट पंचायत मंडळाकडून आतापर्यंत अनेक निर्णय मंडळाच्या मासिक बैठकीत सविस्तर विचारविनीमय न करताच तसेच विरोधी गटातील पंचायत सदस्यांना विश्वासात न घेताच घेतले जातात, असा आरोप फर्नांडिस तसेच परुळेकर यांच्याकडून करण्यात आला आहे. कळंगुट पंचायत मंडळाकडून 2017 ते 2018 पर्यत विरोधी गटातील सदस्यांकडून सादर करण्यात आलेल्या अनेक प्रस्तावांची विद्यमान पंचायत मंडळाकडून साधी दखलसुद्धा घेण्यात आली नसल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

परवान्याच्या चौकशीची मागणी

गावरावाड्यातील पंचतारांकीत हॉटेल प्रकल्पाला देण्यात आलेला परवाना बेकायदा सिद्ध झाल्यास तो तत्काळ रद्द करून वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी कळंगुट फोरमचे अध्यक्ष प्रेमानंद दीवकर यांनी केली आहे.

गावरावाड्यातील पंचतारांकीत हॉटेल प्रकल्पाचा परवाना कुणा जैन नावाच्या बिल्डरला देण्यात आलेला असून हा परवाना नेमका कुणाच्या परवानगीने देण्यात आला ते स्पष्ट करावे, तसेच यासंबंधात पंचायत मंडळाच्या मासिक बैठकीत मंजूर करण्यात आलेला ठराव जनतेसमोर सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Tigers In Goa: माणसाच्या उत्पत्तीपूर्वीपासून पृथ्वीवर असलेले, वाघुर्मे गावात देवासारखे पुजले जाणारे 'वाघ' आम्हाला नकोसे झालेत का?

Goa Assembly Session: आलेमाओ यांनी सभागृहाला स्ट्रीट प्रोव्हिडन्सच्या वापर प्रमाणपत्राची माहिती दिली

Love Horoscope: मनातल्या भावना व्यक्त करायची हीच योग्य वेळ, तुमची 'चंद्र रास' काय सांगते? वाचा

Goa Opinion: कोण म्हणतंय पत्रकारिता संपली?

WI vs AUS: 5 सामने, 5 पराभव! ऑस्ट्रेलियाने 5-0 ने मालिका जिंकत टीम इंडियाच्या 'या' विक्रमाची केली बरोबरी

SCROLL FOR NEXT