Goa: सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त हॉटेल 'ला-पाझ गार्डन'मध्ये गणेश चतुर्थी साजरी
Goa: वास्को शहरातील हॉटेल ला-पाझ गार्डनच्या (Hotel La-Paz Garden) सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त (Hotel La-Paz Garden's Golden Jubilee) हाॅटेलमध्ये श्री गणेश मूर्ती ठेवून चतुर्थी साजरी केली . प्रसिद्ध उद्योगपती दत्तराज साळगावकर (Businessman Dattraj Salgaonkar) यांच्या मालकीच्या हॉटेल लापाझला यंदा ५० वर्षे पूर्ण झाल्याने येथील नवीन व्यवस्थापन 'ला-पाझ गार्डन बीकोन' हॉटेलतर्फे श्री गणेशाची स्थापना केली.
वास्को येथील ग्रामदेव दामोदराच्या स्थळात स्वतंत्रपथ मार्गाच्या बाजूस असलेले हॉटेल ला-पाझ गार्डनचे यंदाचे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने येथील नवीन व्यवस्थापनातर्फे श्री गणेशाची स्थापना करण्यात आली. पूर्वी हॉटेलचे नाव ला-पाझ गार्डन असे होते. नवीन व्यवस्थापनातर्फे 'ला-पाझ गार्डन बीकोन' हॉटेल असे नामकरण करण्यात आले आहे. हॉटेलचे सरव्यवस्थापक राजेश कुमार यांनी यंदा हाॅटेलला ५० वर्षे पूर्ण झाली असल्याने हॉटेलच्या तळमजल्यावर पाच दिवशी गणेशाची स्थापना करण्याचा निर्णय घेतला.
ला-पाझ गार्डन बीकोन हॉटेलचे जनसंपर्क अधिकारी तथा मुरगाव नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष नितीन चोपडेकर, हॉटेलचे इतर अधिकारी व कामगार यांच्या सहकार्याने श्री गणेश चतुर्थी साजरी करण्यात आली. त्यानिमित्त दररोज दुपारी व संध्याकाळी हाॅटेल कर्मचाऱ्यांतर्फे आरती व तीर्थप्रसाद कार्यक्रम होत असतो. मंगळवारी श्री गणेशाचे विसर्जन होणार असल्याने भाविकांनी श्रींचे दर्शन हॉटेलमध्ये येऊन घ्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच हॉटेलमध्ये आलेल्या देशी-विदेशी पर्यटकांनी श्रींचे दर्शन घेतले.त्यांना ते स्वतः राहत असलेल्या ठिकाणी श्रींचे दर्शन झाल्याबद्दल आनंद व्यक्त केला व हाॅटेल व्यवस्थापनाचे आभार व्यक्त केले.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.