Leopard  Dainik Gomantak
गोवा

Leopard in Goa : बांबोळीच्या पठारावर बिबट्याचे दर्शन; स्थानिकांमध्ये घबराट

बिबट्याचे दर्शन झाल्याची वार्ता पसरल्यानंतर आकाशवाणी परिसरात असलेल्या सरकारी वसाहतींमधील कर्मचाऱ्यांमध्ये हा विषय अतिशय गांभीर्याने चर्चिला जात होता.

गोमन्तक डिजिटल टीम

बांबोळी पठारावर बरेचसे वन्य प्राणी दिसतात. विद्यापीठाच्या आवारात तर अनेक मोर वस्तीला आहेत. परंतु, रविवारी संध्याकाळी तेथे आकाशवाणी हॉलिडे होमच्या अगदी निकट एका झाडावर तेथील स्वयंपाकी दाम्‍पत्‍याने बिबट्याचे दर्शन घेतले. त्यामुळे त्‍यांची घाबरगुंडी उडाली.

आकाशवाणी हॉलिडे होममधील स्वयंपाक करणाऱ्या दाम्‍पत्‍यासह तेथे वास्तव्‍य करणाऱ्या एका पाहुण्यानेही या बिबट्याचे दर्शन घेतले. त्यानंतर आरडा-ओरडा झाल्याने बिबट्या तेथून पसार झाला. विद्यापीठाच्या संकुलात गेली किमान दहा वर्षे मोरांचे दर्शन होत आहे. विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या मोकळ्या मैदानात अनेक मोर सहज दृष्टीस पडतात. त्यांचा आवाज विद्यार्थ्यांना सतत ऐकू येतो.

... एकाएकी समाजमाध्‍यमांवर सूचना

आकाशवाणी हॉलिडे होम परिसरात बिबट्या असल्याची वार्ता तत्‍काळ इतर भागांत पसरली व रहिवाशांनी या भागात एकटे फिरू नका, अशा सावध करणाऱ्या सूचना समाजमाध्यमांवर टाकल्या.

विद्यापीठ परिसर हा बराचसा निर्जन भाग आहे. तेथे बऱ्याच गृहनिर्माण वसाहती स्थापन झाल्या आहेत. तरीही लोक एकटे-दुकटे या भागात जॉगिंग किंवा पायी रपेट करण्यासाठी जातात. त्यांच्यासाठी बिबट्याचे वास्तव्‍य ही धोक्याची सूचना आहे.

कितीजणांच्या नजरेस पडला?

बिबट्याचे दर्शन झाल्याची वार्ता पसरल्यानंतर आकाशवाणी परिसरात असलेल्या सरकारी वसाहतींमधील कर्मचाऱ्यांमध्ये हा विषय अतिशय गांभीर्याने चर्चिला जात होता. परंतु, आणखी किती जणांना तो नजरेस पडला हे मात्र समजू शकले नसल्याची माहिती केंद्रीय सरकारी कर्मचारी वसाहतीतील कर्मचाऱ्यांनी दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mhadei River: ‘पिण्यासाठी पाणी’ हे कर्नाटकचे नाटक! ‘म्हादई’ तिन्ही राज्यांसाठी महत्त्वाची; कॅप्टन धोंड यांचे प्रतिपादन

School Bag Weight: ..विद्यार्थ्यांचा खांद्यावर दप्तराचे 'वाढते' ओझे! केंद्राच्‍या निर्णयाकडे गोव्याची पाठ; परिपत्रकाला ‘केराची टोपली’

UTAA: गोविंद गावडे, वेळीप यांनी स्वार्थासाठी संघटनेचा वापर केला! शिरोडकरांचा हल्लाबोल; हुकूमशाही कारभाराचा आरोप

Goa Politics: खरी कुजबुज; साडेसहा कोटींच्या मंडपाचा शोध!

Pandharpur Wari: पावलो पंढरी वैकुंठ भुवनी! वैष्णवांचा मेळा डेरेदाखल, 15 लाख भाविकांची मांदियाळी

SCROLL FOR NEXT