उत्तर गोव्‍यातील खाणव्‍याप्‍त भागात 5 कोटींची कामे मंजूर, जिल्हा खनिज फाउंडेशन ट्रस्टच्‍या बैठकीत निर्णय

North Goa District Mineral Foundation Trust: जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या बैठकीला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार डॉ. दिव्या राणे उपस्थित होत्‍या.
North Goa District Mineral Foundation Trust
North Goa District Mineral Foundation TrustDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: उत्तर गोव्‍यातील खाणव्‍याप्‍त भागात पाच कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करून या भागातील पंचायतींचे सौरऊर्जीकरण, तेथील अनुदानित शाळांसाठी आयटी उपकरणांची खरेदी तसेच शेतजमिनीतून गाळ काढण्‍याची कामे हाती घेण्‍याचा निर्णय उत्तर गोवा जिल्हा खनिज फाउंडेशन ट्रस्टच्‍या बैठकीत घेण्‍यात आला.

जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्‍या अध्‍यक्षतेखाली झालेल्‍या या बैठकीला केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक, आमदार प्रेमेंद्र शेट आणि आमदार डॉ. दिव्या राणे उपस्थित होत्‍या.

North Goa District Mineral Foundation Trust
Goa Sand Mining: रेती परवाने आणखी लांबणार, नव्‍याने जारी होण्‍याची शक्‍यता धूसर; 'सीआरझेड-4'ची आडकाठी

उत्तर गोव्यातील खाण प्रभावित भागांमध्‍ये कौशल्य विकास, शिक्षण, आरोग्यसेवा, ग्रामीण विकास, पशुपालन आदी क्षेत्रांचा विकास साधण्‍यासाठी उत्तर गोवा जिल्हा खनिज फाउंडेशन ट्रस्टने जो निधी मंजूर केलेला आहे, त्‍या निधीतून करण्‍यात आलेल्‍या २२ कोटींपेक्षा अधिक कामांचा बैठकीत आढावा घेण्‍यात आला.

North Goa District Mineral Foundation Trust
Goa Shigmotsav: शिमगोत्सव मेळांना 300 कोटींचे अर्थसाह्य देणार! मंत्री रमेश तवडकर यांची माहिती

तसेच पुढील काळात सर्वच खाणपट्ट्यातील पंचायतींचे सौरऊर्जीकरण, अनुदानित शाळांसाठी आयटी उपकरणांची खरेदी आणि शेतीच्या जमिनीतून गाळ काढण्‍यासारखी महत्त्‍वपूर्ण कामे करण्‍यास मंजुरी देण्‍यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com