Dabolim Airport Controversy: 'दाबोळी'साठी आरपारची लढाई! विमानतळ बंद केल्यास जनता महामार्ग रोखेल, विजय सरदेसाईंचा सरकारला इशारा

Vijai Sardesai On Dabolim Airport: दाबोळी विमानतळावरील नागरी उड्डाणे बंद करण्याचा प्रयत्न झाला, तर दक्षिण गोव्यातील जनता रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग रोखेल, असा इशारा आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.
Dabolim Airport
Dabolim AirportDainik Gomantak
Published on
Updated on

मडगाव: दाबोळी विमानतळावरील नागरी उड्डाणे बंद करण्याचा प्रयत्न झाला, तर दक्षिण गोव्यातील जनता रेल्वे व राष्ट्रीय महामार्ग रोखेल, असा इशारा गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी दिला.

फातोर्डा येथे चार दिवस चाललेल्या कार्निव्हलच्या सांगता सोहळ्यात ते बोलत होते. सरदेसाई म्हणाले की, दाबोळी विमानतळ गोवा मुक्तीपूर्वीपासून अस्तित्वात आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या नावाखाली किंवा व्यावसायिक स्वार्थासाठी तो बंद करण्याचा प्रयत्न सहन केला जाणार नाही.

Dabolim Airport
Goa vs Kerala Women's Cricket: शतकी सलामीनंतरही गोवा पराभूत, सीनियर महिला एकदिवसीय स्पर्धेत केरळचा मोठा विजय

या कार्यक्रमाला आमदार कार्लुस फेरेरा, आपचे आमदार वेंझी व्हिएगश उपस्थित होते. सरदेसाईंनी कार्निव्हलमध्ये ‘मेकिंग गोवा, गोवा अगेन’ ही संकल्पना मांडली. यंदा सादर केलेल्या पर्यावरणाचा संदेश देणाऱ्या छोट्या चित्ररथांना प्रतिसाद मिळाल्याने दरवर्षी आयोजित केले जातील, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com