Cyber Fraud: गुंतवणुकीच्या नावाखाली गोमंतकीयाला 1.64 कोटींचा गंडा; फरिदाबादच्या भामट्याला अटक, गोवा सायबर सेलची हरियाणात कारवाई

Goa Cyber Fraud: शेअर बाजार आणि ‘आयपीओ’मध्ये (IPO) गुंतवणुकीच्या नावाखाली गोव्यातील एका व्यक्तीला १.६४ कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी हरियाणामधील एका तरुणाला अटक केली.
Goa Investment Fraud
Goa Investment FraudDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: शेअर बाजार आणि ‘आयपीओ’मध्ये (IPO) गुंतवणुकीच्या नावाखाली गोव्यातील एका व्यक्तीला १.६४ कोटी रुपयांना गंडा घातल्याप्रकरणी सायबर सेल पोलिसांनी हरियाणामधील एका तरुणाला अटक केली आहे. संशयित आरोपीचे नाव पुष्कर गोयल (३१, रा. बल्लभगढ, फरिदाबाद) असे असून, त्याला हरियाणामधून ताब्यात घेण्यात आले.

पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तिसवाडी तालुक्यातील खोर्ली येथील एका रहिवाशाने याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. १८ ऑक्टोबर २०२५ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत सायबर भामट्यांनी व्हॉट्सॲप आणि बनावट ऑनलाइन लिंक्सचा वापर करून तक्रारदाराशी संपर्क साधला. ‘अप्पर सर्किट’(UC) आणि आगामी ‘आयपीओ’मध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल, असे आमिष त्याला दाखवण्यात आले. या आमिषाला बळी पडून तक्रारदाराने १३ वेगवेगळ्या व्यवहारांद्वारे एकूण १,६४,३९,१९० रुपये विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केले.

Goa Investment Fraud
Goa Crime: म्हापसा हादरलं! अपार्टमेंटजवळ अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्यानं खळबळ; मृत्यूचं कारण अद्याप गुलदस्त्यात

गुंतवणूक करूनही परतावा मिळत नसल्याचे लक्षात आल्यावर तक्रारदाराने सायबर पोलिसांकडे धाव घेतली. तपासादरम्यान पोलिसांनी व्यवहार झालेल्या बँक खात्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. यामध्ये असे दिसून आले की, तक्रारदाराच्या पैशांपैकी २८ लाख रुपये थेट पुष्कर गोयल याच्या खात्यात जमा झाले होते.

ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक अनिल पोळेकर, हवालदार अनय नाईक आणि सुवर्णा गावडे यांच्या पथकाने केली. या मोहिमेला पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर, एएसपी बी. व्ही. श्रीदेवी आणि पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांचे मार्गदर्शन लाभले. संशयिताला न्यायालयात हजर करण्यात आले असून, या रॅकेटमधील इतर सदस्यांचा शोध सुरू आहे.

देशव्यापी रॅकेट?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेल्या आरोपीचे बँक खाते केवळ गोव्यातीलच नव्हे, तर महाराष्ट्र आणि गुजरात मधील इतर अनेक सायबर गुन्ह्यांशीही संबंधित असल्याचे समोर आले आहे. या खात्यातून आतापर्यंत अंदाजे २.४० कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा संशय आहे. सायबर पोलिस आता या प्रकरणातील इतर आरोपींचा आणि या मोठ्या रॅकेटचा शोध घेत आहेत.

Goa Investment Fraud
Goa Sand Mining: रेती परवाने आणखी लांबणार, नव्‍याने जारी होण्‍याची शक्‍यता धूसर; 'सीआरझेड-4'ची आडकाठी

फसवणूक झाल्यास काय करावे?

१९३० वर कॉल करा: सायबर फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पहिल्या २ तासांत (Golden Hour) १९३० या हेल्पलाईनवर कॉल करा. यामुळे तुमचे पैसे भामट्यांच्या खात्यात गोठवण्याची शक्यता वाढते.

ऑनलाइन तक्रार: Cybercrime.gov.in या पोर्टलवर जाऊन आपली तक्रार नोंदवावी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com