Harmal Beach  Dainik Gomantak
गोवा

हरमल किनाऱ्यावरील लमाणी कपडे विक्रेत्यांचा पर्यटकांना त्रास

कारवाईची मागणी: मांद्रे,हरमल,मोरजी किनाऱ्यावर वाढता उपद्रव

दैनिक गोमन्तक

मोरजी: मांद्रे मतदारसंघातील मोरजी , मांद्रे व हरमल या किनारी भागात मोठ्या संख्येने लमाणी कपडे विक्रेत्या बेकायदा व्यवसाय करत असून किनारी भागात देशी व विदेशी पर्यटक लाकडी पलंगावर आराम करीत असताना त्या पर्यटकांना त्रास देत असतात. त्रास देणाऱ्या लमाणी विक्रेत्यांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी व्यावसायिक प्रमेश मयेकर यांनी केली आहे .

पर्यटन हंगाम म्हटला,की केवळ संगीत पार्ट्या आणि मादक पदार्थच महत्वाचे नसतात, त्याला जोडूनच , चोऱ्या ,मारामाऱ्या, फसवणूक ,विनयभंग , बलात्कार यासारखेही प्रकार घडत असतात. यातच आता किनारी भागातील भटक्या लमाणी कपडे विक्रेत्या व भिकाऱ्यांच्या उपद्रवाची भर पडली आहे.

पर्यटन हंगाम नोव्हेंबरपासून एप्रिलपर्यंत चालतो, या हंगामात पाच महिने व्यावसायिक व्यवसाय करतात,अन् त्यावरच उदरनिर्वाह चालतो. पर्यटन हंगामात सर्वात प्रथम आपला व्यवसाय थाटण्यासाठी येतात, त्या लमाणी कपडे विकेत्या. व्यावसायिक किनारी भागात खोल्या भाडेपट्टीवर घेऊन बिऱ्हाड थाटतात. स्त्यालगत अतिक्रमण करून स्टॉल घालतात. नंतर किनारी भागात जिथे विदेशी पर्यटक समुद्र स्नान करून आराम करत असतात, तिथे जाऊन पर्यटकांना त्रास देत कपडे घ्यावेत, म्हणून त्यांच्या मागे लागतात. कपडे घ्या म्हणून त्यांचा पिच्छा पुरवतात. काही महिला,युवती तर विदेशींना मसाजसाठीही पाठीमागे लागतात.

मांद्रे मतदार संघातील किनारी भागात सध्या लमाणी कपडे विकेत्यांचा वावर वाढला असून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी व्यावसायिक प्रमेश मयेकर यांनी केली आहे .

आम्ही पर्यटक किनारी आराम करण्यासाठी आणि पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी येतो मात्र किनारी भागात फिरणाऱ्या मोठ्या प्रमाणात कपडे विक्रेत्या सतावतात. शिवाय यांच्या तगाद्यामुळे व आवाजामुळे ध्वनिप्रदूषणही होते.

-आलेक्स पोस्को

किनारी भागात मोठ्या प्रमाणात फिरत्या कपडे विक्रेत्या व भिकारी पर्यटकांच्या मागे लागतात. त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज आहे. मोकाट गुरे ,भटके कुत्रे यांचीही डोकेदुखी आहे.

-अमोल पांडे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: रेल्वे ट्रॅकवर बसलेल्या आजोबांचा थरारक व्हिडिओ व्हायरल, थोडक्यात बचावले; नेटकरी म्हणाले, 'बाबांचं यमराजासोबत उठणं-बसणं दिसतयं!'

IND vs AUS 2nd ODI Live Streaming: भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणार दुसऱ्या वनडेचा थरार! फ्रीमध्ये लाईव्ह मॅच कधी, कुठे आणि कशी पाहायची? जाणून घ्या!

"तो फक्त सेटिंग करतो, गोव्याला लुटायला आलाय", हणजूण किनारा वाद; मंत्री लोबो यांचा परबांवर शाब्दिक हल्ला

गोसेवेसाठी गोशाळांना मदत करण्यास सरकार तत्पर; Watch Video

IND vs AUS ODI Playing XI: मालिका वाचवण्यासाठी टीम इंडिया सज्ज; वॉशिंग्टन सुंदर आणि हर्षित राणा आऊट? दुसऱ्या वनडेसाठी प्लेइंग इलेव्हनमध्ये होणार मोठा बदल

SCROLL FOR NEXT