मोपा पीडित परिसरातच भाजपने पटकावली सर्वाधिक मते

आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून गुन्हेही नोंदविले
Goa BJP Government
Goa BJP Government Dainik Gomantak
Published on
Updated on

पेडणे: मोपा विमानतळ प्रकल्‍पामुळे जमीन, बागायतींची नुकसान होत असल्याने लोक विरोध करीत आहेत. या आंदोलनकर्त्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज करून गुन्हेही नोंदविले आहेत. दुसरीकडे सुकेकुळण-धारगळ येथे कॅसिनोला वाढता विरोध होतोय. या पाश्वर्भूमीवर नुकत्‍याच झालेल्‍या विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपविरोधात लोक आपला मतदान करतील असा सर्वसाधारण अंदाज होता. मात्र तो साफ फोल ठरला. उलट या परिसरात भाजपला सर्वांत जास्त मते मिळाली आहेत. त्‍याचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Goa BJP Government
मुरगाव पालिकेच्या बालोद्यानातील शौचालयांची दुरवस्था

मतदान केंद्र क्र. 19 : (उगवे पूर्व) : भाजप 209 मते, मगो १४९, काँग्रेस ३८, गोवा रिव्होल्युशनरी 34. केंद्र क्र. 20 (उगवे उत्तर) : भाजप 194, मगो 184 ,काँग्रेस 35, गोवा रिव्होल्युशनरी 35. केंद्र क्र. 26 (मोपा) : भाजप 402, मगो 310, काँग्रेस 37, गोवा रिव्होल्युशनरी 37. केंद्र क्र. 27 (वारखंड उत्तर) : भाजप 206 , मगो 156, काँग्रेस 43, गोवा रिव्होल्युशनरी 68. केंद्र क्र. 28 (वारखंड दक्षिण) : भाजप 281, मगो 158, कॉंग्रेस 8, गोवा रिव्होल्युशनरी 43. मतदान केंद्र क्र.29 : (शमेचे आडवण, तुळसकरवाडी, नागझर) : भाजप 315, मगो 151, कॉंग्रेस 110, गोवा रिव्होल्युशनरी 43. केंद्र क्र. 42 (कासारवर्णे दक्षिण) : भाजप 202, मगो 141, कॉंग्रेस 24 , गोवा रिव्होल्युशनरी 36. केंद्र 43 (कासारवर्णे उत्तर-पूर्व) : भाजप 242, मगो 211, कॉंग्रेस 20, गोवा रिव्होल्युशनरी 12. केंद्र क्र. 44 (चांदेल) : भाजप 416, मगो 254, काँग्रेस 26, गोवा रिव्होल्युशनरी 42. मतदानकेंद्र क्र. 45 (हंसापूर) : भाजप 363, मगो 249, काँग्रेस 24, गोवा रिव्होल्युशनरी 42.

Goa BJP Government
मुरगाव पालिकेच्या बालोद्यानातील शौचालयांची दुरवस्था

दरम्‍यान, धारगळ पंचायत क्षेत्रात भाजपला 2238, मगोला 1126, काँग्रेसला 193 तर गोवा रिव्होल्युशनरीला 527 मते मिळाली. त्यात दाडाचीवाडी मतदान केंद्र क्र. 39 वर बऱ्याच शेतकऱ्याची जमीन हि पोलीस बळ वापरुन लिंक रोड साठी घेण्यात आली व येत आहे.अशा या पाश्वर्भूमीवर भाजपला नेत्रदिपक यश मिळाले असून त्याची सर्वत्र चर्चा होत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com