Konkan Railway Dainik Gomantak
गोवा

Konkan Railway Holi Special Trains: होळीसाठी कोकणात धावणार विशेष ट्रेन्स; येथे करा Booking, वाचा संपूर्ण वेळापत्रक

Holi Special Train: होळी निमित्त कोकण रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेच्या समन्वयानं मुंबई ते मडगाव मार्गावर विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे.

Sameer Amunekar

पणजी: होळी उत्सवाच्या काळात प्रवाशांची वाढती मागणी लक्षात घेता, कोकण रेल्वे प्रशासनानं मध्य रेल्वेच्या समन्वयानं मुंबई ते मडगाव मार्गावर विशेष गाड्या चालवण्याची घोषणा केली आहे. यामुळं प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी अधिक सुविधा उपलब्ध होणार आहे.

विशेष गाड्यांचं तपशीलवार वेळापत्रक आणि आरक्षणाबाबतची माहिती कोकण रेल्वे प्रशासनानं अधिकृतपणे जाहीर केली आहे. प्रवाशांना प्रवासात कोणत्याही अडचणींचा सामना करावा लागू नये यासाठी या विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आलं आहे.

Mumbai CSMT - Madgaon Junction

रेल्वे क्रमांक ०११५१ / ०११५२ – मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी तर रेल्वे क्रमांक ०११२९ / ०११३० – लोकमान्य टिळक टर्मिनस (LTT) - मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक टर्मिनस या विशेष गाड्या निश्चित तारखांना धावणार आहेत.

विशेष गाड्यांचं वेळापत्रक (Konkan Railway Holi Special Train Time Table)

रेल्वे क्र. ०११५१ – मुंबई सीएसएमटी - मडगाव जंक्शन स्पेशल हि ६ मार्च व १३ मार्चला रात्री ००:२० वाजता मुंबई सीएसएमटीहून सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी १:३० वाजता मडगाव जंक्शनला पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०११५२ मडगाव जंक्शन - मुंबई सीएसएमटी स्पेशल ही मडगाव जंक्शनवरून  गुरुवार, ६ मार्च आणि १३ मार्च रोजी दुपारी २:१५ वाजता सुटेल. ही रेल्वे दुसऱ्या दिवशी ३:४५ वाजता मुंबई सीएसएमटीला पोहोचेल.

या विशेष गाड्या दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड आणि थिवी या स्थानकांवर थांबेल.

कोच (एकूण २४ कोच) (Coach Positions)

  • फर्स्ट एसी: ०१ कोच

  • कंपोझिट (फर्स्ट एसी + टू टायर एसी): ०१ कोच

  • टू टायर एसी: ०२ कोच

  • थ्री टायर एसी: १० कोच

  • स्लीपर: ०४ कोच

  • जनरल: ०४ कोच

  • एसएलआर: ०२ कोच

रेल्वे क्रमांक ०११२९ लोकमान्य टिळक (टी) - मडगाव जंक्शन विशेष गाडी १३ मार्च आणि २० मार्च रोजी लोकमान्य टिळक (टी) येथून २२:१५ वाजता सुटणार. दुसऱ्या दिवशी १२:४५ वाजता मडगाव जंक्शन येथे ही गाडी पोहोचेल.

रेल्वे क्रमांक ०११३० मडगाव जंक्शन - लोकमान्य टिळक (टी) विशेष १४ मार्च आणि २१ मार्च रोजी मडगाव जंक्शन येथून १३:४० वाजता सुटणार तर दुसऱ्या दिवशी ०४:०५ वाजता लोकमान्य टिळक (टी) येथे ही गाडी पोहोचेल.

या विशेष गाड्या ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलावडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी, थिवी आणि करमळी या रेल्वेस्थानकांवर थांबेल. 

गाडीची रचना (एकूण २० एलएचबी कोच)

  • फर्स्ट एसी: ०१ कोच

  • टू टायर एसी: ०२ कोच

  • थ्री टायर एसी: ०६ कोच

  • स्लीपर: ०८ कोच

  • पॅन्ट्री कार: ०१ कोच

  • जनरेटर कार: ०२ कोच

Online Train Booking

रेल्वे क्रमांक ०११५२ आणि ०११३० चे बुकिंग २४ फेब्रुवारीपासून सर्व पॅसेंजर रिझर्व्हेशन सिस्टम (PRS), इंटरनेट आणि IRCTC वेबसाइटवर सुरू होईल. प्रवाशांंनी गाड्यांची अधिक माहिती www.enquiry.indianrail.gov.in वर किंवा एनटीईएस अॅप मिळे्ल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Royal Enfield Bike: रॉयल एनफील्ड 'मीटिओर 350' नव्या अवतारात बाजारात दाखल, जाणून किंमत, फीचर्स आणि डिझाइनमधील मोठे बदल

Asia Cup 2025: टी-20 क्रिकेटमध्ये यूएईच्या मोहम्मद वसीमचा वर्ल्ड रेकॉर्ड! बटलरला मागे टाकत रचला नवा इतिहास VIDEO

Viral Video: लग्नासाठी घरचे तयार नाही झाले तर काय कराल? पठ्ठ्यांनी दिलेल्या उत्तराचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; नेटकरी म्हणाले...

Ajit Pawar: अजित पवारांच्या वक्तव्यावरुन गोव्यात रंगलं राजकारण; भाजप प्रदेशाध्यक्षांनी पवारांचं अज्ञानच काढलं

India vs Pakistan: ये तो ट्रेलर था, पिक्चर अभी बाकी है... Asia Cup मध्ये भारत-पाकिस्तान आणखी दोनवेळा भिडणार, संपूर्ण 'गणित' समजून घ्या

SCROLL FOR NEXT