Sameer Amunekar
बागा बीच हा गोव्याच्या नाईटलाइफसाठी प्रसिद्ध आहे. येथे लोकप्रिय क्लब्स आणि पब्स आहेत, जे पर्यटकांचे विशेष आकर्षण आहे.
बागा बीचवर तुम्ही विविध वॉटर स्पोर्ट्स एन्जॉय करू शकता, जसे की, पॅरासेलिंग, जेट स्कीइंग, बोट राइड, स्कूबा डायव्हिंग आणि स्नॉर्केलिंग.
येथे अनेक प्रसिद्ध शॅक्स आणि रेस्टॉरंट्स आहेत, जे सी फूड आणि गोवन डिशेससाठी ओळखले जातात.
बागा बीच कॅलंगुट बीचला लागूनच आहे आणि येथे पर्यटकांसाठी अनेक शॉपिंग स्टोअर्स, स्ट्रीट मार्केट्स आणि कॅफे आहेत
ऑक्टोबर ते मार्च हा काळ बागा बीचला भेट देण्यासाठी सर्वोत्तम मानला जातो कारण हवामान आल्हाददायक असते.
बागा बीचचे वातावरण हे अत्यंत उत्साही, आनंददायी आणि पर्यटकांसाठी आकर्षक आहे. हा बीच दिवसा आणि रात्री दोन्ही वेळेस गजबजलेला असतो.