Goa to Prayagraj Train  Dainik Gomantak
गोवा

Maha Kumbh 2025: गोव्यातील भाविकांसाठी नियोजित गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या तीन परदेशी तर 17 बिहारमधील नागरिकांना 'तख़लिया'

Konkan Railway News: गोव्यातील भाविकांसाठी असलेल्या विशेष गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या तीन परदेशी नागरिकांसह १७ बिहारमधील नागरिकांचा प्रवास थांबवण्यात आला आहे

Akshata Chhatre

पणजी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी सुरू केलेल्या 'मुख्यमंत्री देव दर्शन यात्रा योजने' अंतर्गत प्रयागराजला जाणाऱ्या विशेष रेल्वेगाड्यांमध्ये झालेला एक मोठा गैरप्रकार उघडकीस आला आहे. यात्रेच्या दुसऱ्या फेरीत, गोव्यातील भाविकांसाठी असलेल्या विशेष गाड्यांमधून प्रवास करणाऱ्या तीन परदेशी नागरिकांसह १७ बिहारमधील नागरिकांचा प्रवास थांबवण्यात आला आहे.

गोव्यातील भाविकांसाठी ही योजना असून, नियमांनुसार यात्रेला जाणाऱ्या प्रवाशांची नोंदणी आवश्यक आहे. मात्र, या परदेशी नागरिकांनी आणि बिहारमधील व्यक्तींनी कोणतीही नोंदणी केली नव्हती, तसेच त्यांच्याकडे कोणतेही ओळखपत्र नव्हते आणि यामुळे मडगाव आणि चिपळूण रेल्वे स्थानकांवर त्यांना गाड्यांमधून उतरवण्यात आले.

भजन करत रेल्वेमध्ये चढलेल्या तिघा परदेशी प्रवाशांना गाडीतून उतरवण्यात आलं आणि पुढे बिहारमधील आणखीन १७ व्यक्तींना शोधून ट्रेनमधून चिपळूण येथे उतरवण्यात आलं.

"आमच्या नोंदणीकृत यात्रेकरूंच्या सुरक्षेसाठी, अनधिकृत प्रवाशांना चिपळूण रेल्वे स्थानकावर उतरवण्यात आले," प्रवासी सुरक्षेच्या महत्त्वावर जोर देताना एक अधिकारी म्हणाला. गोव्याहून प्रयागराजला प्रवास करणाऱ्या यात्रेकरूंची यात्रा सुरक्षित व्हावी आणि नियमांचे काटेकोर पालन व्हावे म्हणून अठरा समाज कल्याण अधिकारी तैनात करण्यात आले आहेत.

६ ते १३ फेब्रुवारीच्या काळात गोव्याहून प्रयागराजला एकूण २,८०० हून अधिक यात्रेकरूंनी प्रवास केला आहे. २१ फेब्रुवारीला गोव्याहून आणखीन एक गाडी प्रयागला जाणार आहे आणि गोवेकरांची एकूण इच्छा बघता मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणखीन गाड्या जोडण्याच्या विचारात आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT