Maha Kumbh: गोव्यातील मंत्री-आमदार करणार त्रिवेणी संगमावर 'शाही स्नान', दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता

Goa Ministers Mahakumbh Visit: खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कुटुंबासह या दौऱ्यात सहभागी होणार असल्याने राजशिष्टाचारानुसार सारी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे.
Goa Ministers Mahakumbh Visit
AeroplaneCanva
Published on
Updated on

Goa minister MLA Prayagraj travel

पणजी: मौनी अमावास्येच्या दिवशी प्रयागराज येथील गर्दीमुळे पुढे ढकलावी लागलेली गोव्यातील मंत्री-आमदारांची बहुचर्चित महाकुंभमेळा यात्रा उद्या (ता.१५) निघणार आहे. दाबोळी येथील विमानतळावरून सकाळी ८.३० वाजता खास विमान शंभरेक जणांना घेऊन झेपावणार आहे.

यापूर्वी अशा यात्रेचे वृत्त ‘गोमन्तक’ने प्रसिद्ध केल्यानंतर त्यावरून सरकारवर समाज माध्यमांवर मोठी टीका झाली होती. अशा गोष्टींसाठी सरकारच्या निधीचा विनियोग करू नये, असे अनेकांचे म्हणणे होते. त्यामुळे उद्याच्या दौऱ्यावेळी अशी टीका होणार नाही, निदान सरकारी पैसा या दौऱ्यासाठी खर्च केला नाही, अशी सांगण्याची तयारी ठेवण्यात आली आहे.

दाबोळी ते प्रयागराज असा थेट हवाई प्रवास आहे. सकाळी ११ वाजताच्या दरम्यान प्रयागराज येथे हे सारेजण पोचतील. त्यानंतर उत्तर प्रदेश सरकारने या सर्वांची त्रिवेणी संगम ठिकाणी अतिमहनीय व्यक्तींसाठी राखीव असलेल्या ठिकाणी ने-आण करण्याची व्यवस्था केली आहे.

Goa Ministers Mahakumbh Visit
Maha Kumbh Mela 2025: गोव्याहून प्रयागराजसाठी भाविकांचे 'महाप्रयाण'; मुख्यमंत्रीनीं दाखवला पहिल्या ट्रेनला हिरवा झेंडा

मुख्यमंत्र्यांचीही कुटुंबासह यात्रा

खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे कुटुंबासह या दौऱ्यात सहभागी होणार असल्याने राजशिष्टाचारानुसार सारी व्यवस्था करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. संगम स्नानानंतर सायंकाळी उशिरा प्रयागराजहून गोव्यासाठी परत निघण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

Goa Ministers Mahakumbh Visit
Maha Kumbh Mela 2025: महाकुंभला तेराशे भाविक जाणार! मडगावहून सुटणार गाडी; करमळी अन् थिवी स्थानकावरही थांबा; मंत्री फळदेसाईंची माहिती

दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता

१. मुख्यमंत्री कार्यालयातून या यात्रेचे संयोजन केले आहे. या यात्रेत कोण सहभागी होणार हे गोपनीयच राहील, अशी व्यवस्था करण्यात आली होती.

२. गेले चार दिवस दूरध्वनीवर संपर्क साधून यात कोण कोण सहभागी होऊ इच्छीत आहेत याची चाचपणी करण्यात येत होती.

३. काहीजणांनी आपल्या मतदारसंघातील प्रभावशाली सरपंचांनाही या यात्रेची संधी दिल्याची चर्चा आहे.

४. भाजपशासित राज्यांनी अशा पद्धतीने महाकुंभमेळ्यात सहभागी व्हावे, अशी सूचना दिल्लीतूनच आल्याने या यात्रेविरोधात कितीही गवगवा झाला तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही, असे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com