Maha Kumbh: गोव्यातील नेत्यांची त्रिवेणी संगमात डुबकी! सरकारी अधिकाऱ्यांचाही सहभाग; राणे, कामतांची दांडी

Goa Ministers Mahakumbh Visit: मुख्यमंत्री कार्यालयातून या दौऱ्याचे नियोजन केले होते. यासाठी दाबोळी ते अलाहाबाद या हवाई मार्गावरील एअर इंडियाच्या विमानसेवेचा वापर करण्यात आला.
Goa CM MLA ministers At Prayagraj
CM Pramod Sawant, Damu Naik, Mauvin GodinhoDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Ministers Prayagraj Visit

पणजी: स्नानं कुंभे महापुण्यं, धर्मक्षेत्रे महोत्सवम्। त्रिवेणी संगमे दिव्यं, मोक्षद्वारं सदा स्मृतम्।

या संस्कृत सुभाषिताचा अर्थ आहे. कुंभस्नान करणे अत्यंत पुण्यकारक मानले जाते, तर धर्मक्षेत्रात भव्य उत्सव साजरा केला जातो. त्रिवेणी संगम हे एक दिव्य स्थान मानले जाते, जिथे स्नान केल्याने पवित्रता लाभते. हे स्थान मोक्षप्राप्तीसाठी एक महत्त्वाचे द्वार म्हणून सदैव स्मरणात ठेवले जाते.

या साऱ्याचा अनुभव राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, त्यांच्या पत्नी रिटा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सुलक्षणा आणि मुलगी पार्थिवी यांच्यासह मंत्री व आमदारांनी घेतला. काही मोजके अधिकारी, महाधिवक्ता देविदास पांगम, सभापती रमेश तवडकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनीही संगमावर डुबकी मारली.

मौनी अमावास्येच्या दिवशी हे सारे प्रयागराजला जाणार होते. मात्र, त्यादिवशी प्रयागराज येथे मोठी गर्दी होणार असल्याने उत्तर प्रदेश प्रशासनाने हा दौरा पुढे ढकलण्याची विनंती केली होती.

त्यानुसार आज या दौऱ्याचे आयोजन केले होते. मुख्यमंत्री कार्यालयातून या दौऱ्याचे नियोजन केले होते. यासाठी दाबोळी ते अलाहाबाद या हवाई मार्गावरील एअर इंडियाच्या विमानसेवेचा वापर करण्यात आला. तत्पूर्वी खास विमानाने हा लवाजमा प्रयागराज येथे जाणार, असे जाहीर झाले होते. त्यावर मोठी टीकाही झाली होती. राज्यावर आधीच मोठा कर्जाचा भार असताना अशा गोष्टींवर सरकारने खर्च करावा का, अशी विचारणा करण्यात आली होती. काहींनी विमानाचा एक मार्गी खर्च ४३ लाख रुपये असल्याचा शोधही लावला होता.

मौनी अमावास्येला हा दौरा प्रयागराज येथील गर्दीमुळे रद्द करावा लागल्यानंतर या टीकेची दखल घेण्यात आली. खास विमानाने दौरा करण्याचा विचार सोडून देण्यात आला आणि गोव्यातून थेट अलाहाबाद येथे जाणाऱ्या विमानसेवेचा वापर करण्याचे ठरविले. यासाठी या मार्गावरील १०० तिकीटे आरक्षित करण्यात आली. त्यानंतर कोण कोण जाणार त्यांची यादी केली. दाबोळी विमानतळावरून सकाळी ९.३० वाजता एआय ३१५३ या विमानातून ते सारे प्रयागराजला रवाना झाले. मात्र, रात्री ११ वाजेपर्यंत ते गोव्याकडे निघाले नव्हते.

Goa CM MLA ministers At Prayagraj
Maha Kumbh: गोव्यातील मंत्री-आमदार करणार त्रिवेणी संगमावर 'शाही स्नान', दौऱ्याबाबत कमालीची गुप्तता

सरकारी अधिकारीही सहभागी

राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, त्यांच्या पत्नी रिटा, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, त्यांच्या पत्नी सुलक्षणा, मुलगी पार्थिवी, सभापती रमेश तवडकर, महाधिवक्ता देविदास पांगम, भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक, मंत्री रोहन खंवटे, माविन गुदिन्हो, गोविंद गावडे, नीळकंठ हळर्णकर, सुभाष फळदेसाई, आमदार संकल्प आमोणकर, डॉ. चंद्रकांत शेटये, केदार नाईक, राजेश फळदेसाई, प्रवीण आर्लेकर, जीत आरोलकर, प्रेमेंद्र शेट, गणेश गावकर, उल्हास तुयेकर, दाजी साळकर यांच्यासह माजी आमदार दयानंद सोपटे, मुख्यमंत्र्यांचे विशेष कार्य अधिकारी मनोज पाटील, भाजपचे नेते रूपेश कामत, मुख्यमंत्री कार्यालयातील संकेत आर्सेकर, भाजप राज्य कार्यकारिणी सदस्य सुवर्णा तेंडुलकर, प्रवक्ते गिरीराज पै वेर्णेकर, राज्यपालांचा मुलगा अर्जुन, जावई अरूण कृष्ण धान,विशेष कार्यकारी अधिकारी उपेंद्र जोशी, प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी संजीव जोगळेकर, आदी या दौऱ्यात सहभागी झाले आहेत.

Goa CM MLA ministers At Prayagraj
Mahakumbh: गोव्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री, आमदार प्रयागराजमध्ये दाखल; महाकुंभात करणार पवित्र स्नान

राणे, कामतांची दांडी

प्रयागराजच्या या दौऱ्यात मंत्री विश्वजीत राणे, आलेक्स सिक्वेरा, बाबूश मोन्सेरात, आमदार दिगंबर कामत, मायकल लोबो, दिलायला लोबो, दिव्या राणे, जेनिफर मोन्सेरात, आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांचा समावेश नव्हता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com