Molem Accident Dainik Gomantak
गोवा

Molem: मोले-नंद्रण राष्ट्रीय महामार्गावर ट्रकला दुचाकीची जोरदार धडक; कर्नाटकातील दोन तरुणांचा मृत्यू

Goa Highway Accident: मोले-नंद्रण राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीनं जोरदार धडक दिल्यानं दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय.

Sameer Amunekar

मोले: मोले-नंद्रण राष्ट्रीय महामार्गावर एक भीषण अपघात घडला आहे. बंद पडलेल्या ट्रकला दुचाकीनं जोरदार धडक दिल्यानं दोघा तरुणांचा मृत्यू झाल्याची घटना घडलीय. दोन्ही तरूण कर्नाटकमधील असल्याची माहिती आहे.

मोले-नंद्रण राष्ट्रीय महामार्गावर एक मालवाहू ट्रक बंद पडल्याने रस्त्यावर उभा होता. त्याचवेळी भरधाव वेगाने आलेल्या दुचाकीने या ट्रकला जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता एवढी होती की दुचाकीवरील दोघांनाही गंभीर दुखापत होऊन त्यांचा मृत्यू झाला.

राजेश देसाई (वय- २५, रा.जोईडा, कर्नाटक), निखिल मडिवळ (वय- २४, रा. हलियाळ, उत्तर कर्नाटक) अशी मृतांची नावं आहेत.

अपघातानंतर राजेश देसाईचा जागीच मृत्यू झाला. तर दुचाकीवर त्यांच्या मागे बसलेला त्याचा सहकारी निखिल यालाही गंभीर दुखापत झाली. त्याला तातडीने धारबांदोडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.


मोले पोलिसांनी या अपघाताचा तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lucky Zodiac Signs 2026: व्यापाऱ्यांसाठी जॅकपॉट अन् नोकरदारांना पगारवाढ! ऑगस्ट महिन्यात 'या' राशीची चांदीच चांदी; पैशांची चिंता कायमची मिटणार

Government Jobs: कर्मचारी भरती आयोगाकडून 3 हजार नोकऱ्या; आता आणखी 2 हजार पदांसाठी सरकार सज्ज, CM प्रमोद सावंतांची मोठी घोषणा

Bori Road Safety Issue: बोरीतील धोकादायक साकवाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष? कठडा तुटल्याने वाहनचालकांच्या जीवाला धोका, तातडीने दुरुस्तीची गरज

Garuda Lenka: राजासाठी जीव देण्याची शपथ, मृत्यूची बातमी मिळताच आत्मबलिदान; होयसळ साम्राज्याच्या ‘गरुड लेंका’ योद्ध्यांची रोमांचकारी गाथा

Viral News: आश्चर्य..! दोन तोंड अन् आठ पायांच्या वासराचा जन्म; तब्बल 5 तास चालली प्रसूतीची शस्त्रक्रिया Watch Video

SCROLL FOR NEXT