Goa Politics: जातीनिहाय सर्वेक्षण यापूर्वीच झाले आहे! आता नव्याने करून काय लाभ होणार? नेत्यांतील चर्चेचा सूर

Cast Based Survey Goa: भाजप सूत्रांच्या मते, जातीनिहाय सर्वेक्षण यापूर्वीच झाले आहे. त्यानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू झाले, आता नव्याने सर्वेक्षण करून काय लाभ होणार आहे?
Pramod Sawant, Ravi Naik, Damu Naik
Pramod Sawant, Ravi Naik, Damu Naik Dainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: जातीनिहाय सर्वेक्षणाच्या प्रश्‍नावर भंडारी समाजाच्या असंतुष्ट नेत्यांनी विविध राजकीय नेत्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या व बैठकांचे सत्र सुरू केले असले तरी सत्ताधारी भाजपमधील एका वर्गाला हा वाद निरर्थक वाटतो.

भाजप सूत्रांच्या मते, जातीनिहाय सर्वेक्षण यापूर्वीच झाले आहे. त्यानुसार ओबीसींना २७ टक्के आरक्षण लागू झाले, आता नव्याने सर्वेक्षण करून काय लाभ होणार आहे?

भाजपने मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखाली २००५ मध्ये ओबीसींना आरक्षण देण्याच्या इराद्याने सर्वेक्षण करून घेण्याचा निर्णय घेतला होता. प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री असताना २००५-२००७ या काळात सर्वेक्षण झाले नाही. २००७ साली दिगंबर कामत मुख्यमंत्री असताना हे काम पुढे नेण्यात आले.

Pramod Sawant, Ravi Naik, Damu Naik
Bhandari Samaj: भंडारी समाजात नेतृत्वबदलाच्या हालचाली तीव्र, समाज दुभंगणार; रवींचा पुढाकार

त्यानुसार पंचायत पातळीपासून समाज नेत्यांच्या भेटीगाठीतून प्रत्येक गावात हे सर्वेक्षण करण्यात आले. २०१३ मध्ये पर्रीकर पुन्हा मुख्यमंत्री बनल्यानंतर ओबीसी आयोगाने राज्यात ओबीसी लोकसंख्या २६ टक्के असल्याचे जाहीर केले. मंत्रिमंडळाने त्यानुसार ग्रामपंचायत, जिल्हा पंचायत पातळीवर निवडणुकीत तसेच सरकारी नोकऱ्यांसाठी २७ टक्के आरक्षण जाहीर केले.

भाजपचा आरोप आहे, की दयानंद मांद्रेकर, महादेव नाईक आणि दिलीप परूळेकर मंत्री असताना हे आरक्षण जाहीर झालेले आहे. ओबीसींमध्ये १९ जाती आहेत. त्यात भंडारी प्रमुख असून दोन तृतीयांश इतरांमध्ये खारवी, च्यारी, कोमारपंत, रेंदेर आदींचा समावेश आहे.

Pramod Sawant, Ravi Naik, Damu Naik
Bhandari Samaj: भंडारी समाज सांगेल, तसे मी वागेन! मांद्रेकरांची स्पष्टोक्ती; 'भाजपसोबत'चे भाष्य टाळले

‘‘नव्याने सर्वेक्षण करून काय साध्य करणार? ओबीसींची गोव्यातील संख्या गेल्या १० वर्षांत वाढली आहे काय?’’ असा प्रश्‍न करून भाजपचा एक प्रमुख नेता म्हणाला, ‘‘सरकारातील भंडारी समाजाच्या प्रतिनिधित्वाबाबत नेत्यांमध्ये नाराजी आहे. सरकारात भंडारींचा टक्का वाढत नसल्याने त्यांची अस्वस्थता वाढली आहे.’’

तो म्हणाला, उत्तर भारत आणि कर्नाटकातून गेल्या २० वर्षांत गोव्यात मोठ्या प्रमाणात स्थलांतरीत वर्ग आला. गोव्यातील लोकसंख्येचा वाढलेला टक्का याच उत्तर भारतीय व मुस्लिमांमुळे आहे. त्यात ओबीसींचा टक्का नाही. नवीन सर्वेक्षणामुळे स्थानिकांचा कोणाचा फायदा होणार नाही.

आम्ही सरकारात असताना सर्वेक्षण झाले होते, त्यानुसार २७ टक्के आरक्षण दिले आहे हे खरे असले तरी, त्यावेळी काही गोष्टी आमच्याही लक्षात आल्या नाहीत. सर्व जातीनिहाय सर्वेक्षणे १० वर्षांनंतर पुन्हा केली जातातच, तेव्हा ते पुन्हा करण्यात काय चूक आहे? आम्ही केवळ ओबीसी नव्हे, तर संपूर्ण गोव्याचे जातीनिहाय सर्वेक्षण करण्याची मागणी करत आहोत. २००७ च्या सर्वेक्षणात भंडारी समाजाची लोकसंख्या अडीच लाख दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात ती चार लाख आहे. केवळ बार्देस तालुक्यात ती एक लाख १० हजार आहे. शिवाय फोंडा, मये, डिचोली येथे भंडारी समाजाची लोकसंख्या मोठी आहे. सर्वांच्या लक्षात ही गोष्ट आली आहे. नेत्यांना ती पटलीही; परंतु अनेक भंडारी नेते भाजपमध्ये असल्याने ते बोलत नाहीत.

किरण कांदोळकर, भंडारी नेते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com