MLA's disqualification
MLA's disqualification  Dainik Gomantak
गोवा

MLA Disqualification Petition : आमदार अपात्रता याचिकेबाबत गोवा खंडपीठात 2 मे रोजी निवाडा

दैनिक गोमन्तक डिजिटल

काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या त्या आठ आमदारांच्या अपात्रता याचिकेवर सभापतींनी लवकर सुनावणी घेण्यासंदर्भात गिरीश चोडणकर यांनी सादर केलेल्या याचिकेवरील निवाडा मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने येत्या 2 मे रोजी ठेवला आहे.

विशेष खंडपीठाने गेल्या शुक्रवारी सुनावणी पूर्ण केली, ज्यामध्ये याचिका कर्त्याच्या वकिलांनी 90 दिवसांच्या कालावधीत अशा प्रकरणांचा निपटारा करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश असूनही सभापतींकडून हेतुपुरस्सर विलंब केला जात असल्याचा युक्तिवाद केला होता.

काँग्रेसचे पाटकर यांनी दाखल केलेल्या अपात्रता याचिकेवरील सुनावणी सुरू आहे. त्यानंतर चोडणकर यांच्या प्रकरणाची सुनावणी होईल, असे म्हणणे सभापती तवडकर यांनी न्यायालयात सादर केले होते.

ज्याने प्रथम याचिका दाखल केली, त्याची प्रथम सुनावणी केली जाते. याचिकांवर निर्णय घेण्याचा अधिकार सभापतींना आहे. सर्व याचिकांवर सुनावणी सुरू आहे. दोन प्रकरणांमध्ये प्रतिवादींना नोटिसा बजावल्या आहेत, अशी बाजू सभापतींतर्फे ॲडव्होकेट जनरल पांगम यांनी मांडली होती

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Panaji: भूक लागलीय, भजी कोठे मिळतील? केस काळे केले म्हणून कोणी 'भाऊ' होत नाही; पणजीतील मतदाराचा नाईकांवर रोष

Goa Loksabha Voting: उरले दोन तास! गोव्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

Goa Eco-Friendly Booth Video: गोव्यातील इको-फ्रेन्डली मतदान केंद्राची चर्चा; व्हिडिओ, फोटो व्हायरल

High Court Order: वृद्ध सासूसोबत राहण्यास पत्नीचा नकार; उच्च न्यायालयाने दिला घटस्फोटाचा आदेश

Goa Election 2024 Voting Live: राज्यात दुपारी तीनपर्यंत 61.39 टक्के मतदान

SCROLL FOR NEXT