Court | Goa Crime News  Dainik Gomantak
गोवा

Margao : चांदर रेल रोको प्रकरणातील खटल्यावर 26 रोजी निवाडा

संशयितांचा अर्ज फेटाळण्याची सरकारी पक्षाकडून मागणी

दैनिक गोमन्तक डिजिटल

कोळशाची वाहतूक वाढेल, या भीतीने रेल्वे मार्ग दुपदरीकरणाला विरोध करण्यासाठी नोव्हेंबर 2020 मध्ये चांदर येथे केलेल्या रेल रोको आंदोलनातील 4 संशयितांवर खटला चालवायचा की त्यांना निर्दोष मुक्त करावे यावर मडगाव प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी 26 एप्रिल रोजी निवाडा देणार आहेत.

दरम्यान, या चार संशयितांनी आपल्याला आरोपनिश्चितीपूर्वीच निर्दोष मुक्त करण्यासाठी सादर केलेला अर्ज फेटाळण्यात यावा, अशी मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली आहे.

नोव्हेंबर 2020 मध्ये 1 व 2 रोजीच्या रात्री तीन रेखीय प्रकल्पांना विरोध करणाऱ्या हजारो आंदोलकांनी चांदर येथील रेल मार्ग अडविला होता. याप्रकरणी मायणा-कुडतरी पोलिसांनी सार्वजनिक रस्ता अडविल्याप्रकरणी आठ आंदोलकांविरोधात भादंसंच्या १४३, १४५, ३४१ यासह १४९ कलमाखाली आरोपपत्र दाखल केले होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये

अभिजीत प्रभुदेसाई, कॅ. विरियातो फर्नांडिस, डायना तावारीस आणि सबिता मास्कारेन्हास या चारजणांनी ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी अजित रॉय यांनी एका आदेशान्वये हा मार्ग सार्वजनिक वाहतुकीस बंद केला होता.

त्यामुळे सार्वजनिक वाहतुकीला अडथळा आणण्याचा आरोप दाखल करून घेणेच शक्य नाही, असा दावा करीत आपल्याला मुक्त करावे, अशी मागणी करणारा अर्ज दाखल केला होता.

सरकारी वकिलांचा अर्जाला विरोध

सरकारी वकिलांनी या अर्जाला विरोध करताना संशयितांनी मार्ग अडविला होता, हे प्रत्यक्षदर्शींच्या जबान्यांवरून स्पष्ट झाले असून त्यांच्याविरोधात प्रथमदर्शनी पुरावा असल्याचे सिद्ध झाले आहे. संशयितांनी उपस्थित केलेला मुद्दा ग्राह्य आहे की नाही, यावर आरोपनिश्चित करण्याच्या प्रक्रियेच्यावेळी विचार करणे शक्य असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

संपादकीय: फुटबॉलप्रेमींचा विश्वासघात

Lashkar-e-Taiba Commander Killed: दहशतवादाचा फणा ठेचला! लष्कर-ए-तैयबाचा कुख्यात कमांडर मूसा ठार, भारतीय जवानांची मोठी कारवाई

खरी कुजबुज: एका नावाने उडवली अनेकांची झोप

Gyanesh Kumar Resignation Demand: 'SIR'वरून काँग्रेस आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, केंद्राच्या दबावाचा खरगेंचा आरोप

Asian Games 2026: तिरंदाजीत भारताची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये चीनचा धुव्वा उडवत टीम इंडियानं रचला इतिहास; अटीतटीच्या सामन्यात मारली बाजी

SCROLL FOR NEXT