Crime News
Crime NewsGomantak Digital News

Mandrem Crime News : मांद्रे चाकू हल्लाप्रकरणी संशयितास सात दिवस कोठडी

विदेशी पर्यटक महिला व स्थानिकावर केला होता चाकू हल्ला

दांडोसवाडा-मांद्रे येथे विदेशी पर्यटक महिला व युरिको डायस या स्थानिकावर चाकूने हल्ला केल्याप्रकरणी पेडणे पोलिसांनी अटक केलेला संशयित अभिषेक उमेशचंद्र वर्मा (27) याला पेडणे पोलिसांनी पेडणे प्रथम श्रेणी न्यायालयापुढे हजर केले असता सात दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली.

पेडणे पोलिसांनी संशयिताला विनयभंग, खुनाचा प्रयत्न करणे, जीवे मारण्याची धमकी देणे या गुन्ह्यांखाली अटक केली आहे.

संशयित अभिषेक वर्मा हा मूळ डेहराडून, चक्रता, उत्तराखंड येथील आहे. पेडणे पोलिस ठाण्याचे निरीक्षक दत्ताराम राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विवेक हळर्णकर हे पुढील तपास करत आहेत.

Crime News
Vishwajit Rane: सत्तरीकरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी सदैव तत्पर; वाळपईत लवकरच क्रीडा संकुल बनणार

मांद्रेतील ‘विंग वेब’ रिसॉर्टमधील घटना

दांडोसवाडा-मांद्रे येथील ‘विंग वेब’ या रिसॉर्टमध्ये 29 मार्च रोजी रात्री 2 वाजता संशयित अभिषेक वर्मा विदेशी महिलेच्या खोलीत घुसला होता. अज्ञात व्यक्ती खोलीत घुसल्याने भीतीमुळे त्या महिला पर्यटकाने आरडाओरडा करताच तिच्या मदतीला डायस धावून आला असता संशयिताने दोघांवरती चाकूने हल्ला केला. त्यात दोघेही गंभीररीत्या जखमी झाली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com