Gyanesh Kumar Resignation Demand: 'SIR'वरून काँग्रेस आक्रमक; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, केंद्राच्या दबावाचा खरगेंचा आरोप

Gyanesh Kumar Resignation Demand: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून, त्यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलने करण्यात आली आहेत.
Gyanesh Kumar Resignation Demand
Gyanesh Kumar Resignation DemandDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली: ‘‘मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पडताळणी (एसआयआर) मोहिमेतील गैरप्रकारांची जबाबदारी निश्चित करीत, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांना पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी मंगळवारी पक्षाच्या कार्यकारिणीच्या बैठकीत केली. तसेच केंद्राकडून ज्ञानेशकुमार यांच्यावर दबाव वाढत आहे.

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमार यांच्याविरोधात काँग्रेस आक्रमक झाली असून, त्यांच्या राजीनाम्यासाठी देशभरात आंदोलने करण्यात आली आहेत. तसेच, ‘एसआयआर’वरूनही काँग्रेसने ज्ञानेशकुमार यांना लक्ष्य केले आहे. या पार्श्‍वभूमीवर, काँग्रेसच्या कार्यकारिणीची मंगळवारी दिल्लीमध्ये बैठक झाली.

Gyanesh Kumar Resignation Demand
Goa Weather: गोव्यात पावसाने 1980 नंतरचा विक्रम मोडला; 31.5 टक्के तूट, 'ऑक्टोबर हिट'ची शक्यता

या बैठकीमध्ये खर्गे यांनी वरील मागणी केली. या बैठकीत लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी २०२४मधील लोकसभा निवडणुकीतील राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विजयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ‘ईव्हीएम’ आणि मतदारयाद्यांत गडबड करून ती निवडणूक जिंकण्यात आली होती. एकप्रकारे ती मॅच फिक्सिंग होती, असा आरोप करत याविरोधात रस्त्यावर उतरत आंदोलन करण्याचे आवाहन त्यांनी केले.

खर्गे यांनी केल्या पाच मागण्या

‘एसआयआर’चा निर्णय कोणी घेतला? दोन निवडणूक आयुक्तांना अंतर्गत पोर्टलपासून कोणी दूर ठेवले, अशी विचारणा करत काँग्रेस अध्यक्षांनी पाच मागण्या केल्या.

मतदारयाद्यांतील बदलांचा संपूर्ण डेटा सार्वजनिक केला जावा

हटविलेल्या मतदारांना सूचित केले जावे व त्यांना अपिलाची संधी दिली जावी

राजकीय पक्षांना आवश्यक तो निवडणूक डेटा सोप्या पद्धतीने दिला जावा

गंभीर विसंगती असलेल्या मुद्द्यांची स्वतंत्र आणि निर्धारित कालावधीत चौकशी केली जावी

निवडणूक प्रक्रियेशी संबंधित महत्त्वाचा डेटा व निर्णयांची पारदर्शकता सुनिश्चित केली जावी.

Gyanesh Kumar Resignation Demand
Goa Paddy Farming: पावसाने आणखी दडी मारली तर भातशेती धोक्यात; कणसे धरण्याच्या काळात कृषी संचालकांचा इशारा

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com