Government Jobs| Goa News Dainik Gomantak
गोवा

Goa Recruitment: सुवर्णसंधी! तरुणांनो लागा तयारीला, 'या' सरकारी विभागात होणार मेगा भरती

Manish Jadhav

गोवा राज्य मानवसंसाधन (मनुष्यबळ) विकास महामंडळातर्फे 944 विविध पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. त्याविषयीची जाहिरात वर्तमानपत्रांमध्ये प्रसिद्ध झाली आहे. इच्छुक उमेदवार 18 ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करु शकतात. पदांची ही संख्या ढोबळमानाने (अंदाजित) असून, त्यात वाढ किंवा घट होण्याची शक्यताही असल्याचे महामंडळाचे म्हणणे आहे.

मनुष्यबळ विकास महामंडळाने ही मेगा भरती सुरु केली असून, त्यात चालकांची 100, ज्युनियर ऑफिस असिस्टंट 100, इलेक्ट्रिशियन 10, पुरुष सुरक्षा रक्षक 350, महिला सुरक्षा रक्षक 150, पुरुष सुरक्षा पर्यवेक्षक 10, स्री सुरक्षा पर्यवेक्षक 5, हाऊसकिपिंग पर्यवेक्षक 4, अटेंडंट पुरुष 100, महिला 100, प्लंबर आणि कॅज्युअल कर्मचारी 10 अशा पदांचा समावेश आहे. यातील पदांसाठी साधारण 14,5000 ते 20 हजार रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे. अर्ज 30 सप्टेंबर ते 18 ऑक्टोबरपर्यंत उपलब्ध असणार आहेत.

पैसे उकळण्याचा डाव

‘आप’चे नेते रामराव वाघ म्हणाले की, प्रत्येक अर्जासाठी 50 रुपये आकारुन बेरोजगारांकडून पैसे उकळण्याचा डाव आखला आहे. या जागांसाठी तीस ते चाळीस हजार युवक अर्ज करतील, त्यातून हे महामंडळ लाखो रुपये जमा करणार आहे, असेही रामराव वाघ म्हणाले.

ही तर बेरोजगारांची थट्टा

ही भरती बेरोजगारांची थट्टा करण्याचा प्रकार आहे. ज्या पदासाठी साधारण 18 हजार रुपये वेतन आहे, त्यासाठी महामंडळ संबंधित यंत्रणेकडून 24 हजार रुपये आकारते; परंतु सहा हजार रुपये विविध कारणांसाठी कापले जातात. महामंडळ असल्याने उमेदवारांना इतर सुविधा मिळत नाहीत; पण कापलेले पैसे नंतर कुठे जातात याची सरकारने चौकशी करावी, अशी मागणी रामराव वाघ यांनी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोव्यात 'कायदा सुव्यवस्था' राखण्यासाठी पोलिसांची दिवस-रात्र मेहनत; वाळपई, शिवोलीत 'पडताळणी मोहिम'

का साजरा करतात 'World Heart Day'? हृदयविकारांचे प्रकार आणि 'कोरोना'नंतर वाढलेल्या शस्त्रक्रियांमागची कारणे जाणून घ्या

FC Goa: 'हेर्रेरा'ची सामन्यानंतरही दिलदार कामगिरी! ईस्ट बंगालच्या चाहत्यांप्रती केला 'असा' आदर व्यक्त; म्हणाला की..

Mandrem Panchayat: मांद्रेत डोंगरकापणी रोखणार! नवनिर्वाचित सरपंचांचा विश्वास

Margao News: पावसामुळे कोकण रेल्वे उड्डाणपुलावरील रस्ता परत खराब! नव्याने हॉटमिक्सिंग करण्याची लोकांची मागणी

SCROLL FOR NEXT