Goa LDC Recruitment Scam: नोकर भरती घोटाळ्यातील डिचोलीतील 'चिंटू-पिंटू' - द लेडी डॉन कोण?, गोवा फॉरवर्ड पक्षाचा रोख कोणाकडे?

LDC Recruitment Scam: काही दिवसांपूर्वी विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक भरती घोटाळा उघडकीस आणला होता.
Goa LDC Recruitment Scam: नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी डिचोलीतील चिंटू पिंटूवर करडी नजर, मुख्य सचिवांकडे करणार तक्रार: दुर्गादास कामतांची माहिती
Durgadas Kamat Dainik Gomantak
Published on
Updated on

काही दिवसांपूर्वी विजय सरदेसाई यांनी दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयातील कनिष्ठ लिपिक भरती घोटाळा उघडकीस आणला होता. यासंदर्भात खुलासा करण्यासाठी महसूलमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करुनही प्रतिसाद मिळाला नव्हता. आता लगेच या बाबतीत ते मुख्य सचिवांकडे तक्रार करणार आहेत, अशी माहिती गोवा फॉरवर्ड पक्षाचे सरचिटणीस दुर्गादास कामत यांनी दिली.

विजय सरदेसाई यांनीही मुख्यमंत्र्यांना भेटून या प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली होती. तथापि, सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहात असताना, आम्ही तपासणी केली आणि धक्कादायक तपशील उघड केले, असे कामत यांनी म्हटले आहे. या भरती प्रक्रियेसाठी मुलाखतीसाठी घेतलेल्या परीक्षा निकालांमध्ये फेरफार केला गेला असून त्यात डिचोली पॉलिटेक्निकमधील चिंटू आणि पिंटू नावाने ओळखले जाणारे दोन अधिकारी आणि ज्यांना ‘द लेडी डॉन’ म्हणून संबोधले जाते अशा एका महिलेचा हात असल्याचा आरोप कामत यांनी केला आहे.

Goa LDC Recruitment Scam: नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी डिचोलीतील चिंटू पिंटूवर करडी नजर, मुख्य सचिवांकडे करणार तक्रार: दुर्गादास कामतांची माहिती
Goa LDC Recruitment Scam: एलडीसी नोकरी भरती 'महा घोटाळा', भ्रष्टाचारात अनेकजणांचे हात बरबटले; अमित पाटकरांचा घणाघात

हरियाणात, 1999-2000 दरम्यान, कनिष्ठ शिक्षक भरती घोटाळ्यामुळे मंत्री चौटाला आणि परीक्षा नियंत्रक यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्याचप्रमाणे, छत्तीसगडमध्ये भरती घोटाळा झाला, ज्यामुळे गंभीर कायदेशीर परिणाम झाले. गोव्यातील या एलडीसी भरती घोटाळ्यात सहभागी असलेल्यांवर कायदेशीर कारवाई करण्यास आम्ही तयार आहोत. आम्ही ऐकले आहे की चिंटू आणि पिंटू हे दोन अधिकारी आता स्वतःला वाचवण्यासाठी धडपडत आहेत. मात्र, ज्यांच्यावर या घोटाळ्यामुळे अन्याय झाला त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, असे कामत यांनी म्हटले आहे.

Goa LDC Recruitment Scam: नोकर भरती घोटाळ्याप्रकरणी डिचोलीतील चिंटू पिंटूवर करडी नजर, मुख्य सचिवांकडे करणार तक्रार: दुर्गादास कामतांची माहिती
Goa LDC Recruitment Scam: ‘एलडीसी’भरतीत मोठा घोटाळा! 13 हजार उमेदवारांवर अन्याय; सरदेसाईंनी उठवलं रान

‘...तर आम्ही न्यायालयात जाऊ’

गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई मुख्य सचिवांना एक औपचारिक पत्र पाठवणार आहेत, ज्यात त्वरित कारवाईची मागणी केली जाईल. ठोस पावले उचलली नाहीत, तर हा प्रश्न आम्ही न्यायालयात नेऊ. मुख्यमंत्री आपले आश्वासन पूर्ण करतील आणि सखोल चौकशी सुरु करतील, अशी आम्हाला आशा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com