Job Fair Bicholim Dainik Gomantak
गोवा

Job Fair Bicholim: 317 जण आले, 84 युवांना 'ऑफर लेटर'; सनी मानकर यांच्‍यातर्फे डिचोलीत 'नोकरभरती मेळावा'

Sunny Mankar job fair Bicholim: डिचोलीत आयोजित नोकरभरती मेळाव्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

गोमंतक ऑनलाईन टीम

डिचोली: डिचोलीत आयोजित नोकरभरती मेळाव्‍याला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ३१७ जणांनी त्‍यात सहभाग घेतला. पैकी ८४ जणांना मुलाखतीवेळी लगेच ऑफर पत्रे देण्यात आली.

‘नवचैतन्य युवा पर्व’अंतर्गत उद्योजक चैतन्य उर्फ सनी मानकर यांनी रविवारी (ता. १२) या नोकरभरती मेळ्याचे आयोजन केले होते. ज्येष्ठ महिला सुचिता परब यांच्या हस्ते या मेळ्याचे उद्‌घाटन करण्यात आले. या प्रसंगी चैतन्य मानकर, संदीप पेडणेकर, चैतन्य पाटील, अनिकेत ढोबळे उपस्थित होते.

डिचोली मतदारसंघात बेरोजगारीची समस्या असून, ती सोडविण्यासाठी या नोकरभरती मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. बेरोजगारी सोडविण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार, असे मानकर यांनी सांगितले.

या कंपन्‍यांचा होता सहभाग

बोर्डे-डिचोली येथे आयोजित केलेल्या या नोकर भरती मेळाव्यात ‘महिंद्रा ॲण्ड महिंद्रा, जीनो फार्मास्युटिकल्स, युनिकॅम, क्रॉम्पटन आदी नामवंत उद्योग कंपनी सहभागी झाल्या होत्या. या कंपन्यांनी वेगवेगळे काऊंटर उघडले होते. मेळाव्यात डिचोली मतदारसंघातील वेगवेगळ्या भागातील बेरोजगार युवक-युवती सहभागी झाल्या होत्या.

विविध उद्योग कंपनीकडून युवक-युवतींच्या मुलाखती घेण्यात आल्या. विविध कंपन्यांनी मिळून ८४ जणांना तात्काळ ऑफर पत्रे देण्यात आली. काही बेरोजगारांनी महाराष्ट्रात नोकरीचा प्रस्ताव स्वीकारला आहे. कंपनींनी नोकरीसाठी ऑफर पत्रे दिल्याने युवक-युवतींनी समाधान व्यक्त केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

काजू हंगाम ओसरला, फेणीच्या भट्ट्या थंडावल्या, बोंडूच्या कमतरतेमुळे उत्पादनात 50 टक्के मोठी घट; डिचोलीत फेणीचा गाळप हंगाम अंतिम टप्प्यात

Goa Tiger Death: गोव्याच्या जंगलात सांडतेय वाघांचे रक्त! प्रशासनाची मात्र डोळेझाक; केरी, गोळावली नंतर आता साकोर्डा,वाघांच्या हत्यांची मालिका थांबेना

Morajit Traffic Jam: मोरजीत वाहतुकीचा खेळखंडोबा! रस्त्याच्या बाजूनेच वाहनांचे ‘पार्किंग’; नागरिक त्रस्त

Pakistan Donkey Meat Export: चिनी कंपनीनं धमकी देताच पाकड्यांची तरारली, शाहबाज सरकारनं गाढवाच्या मांस निर्यातीला दिली मंजुरी; काय नेमकं प्रकरण?

VIDEO: पांढरी साडी, हवाई चप्पल अन् हातात झालमुडी! भाजप कार्यालयाबाहेर ममता 'दीदीं'चा अवतार पाहून कार्यकर्ते अवाक; 'हम्बा-हम्बा'नं उडवली खळबळ

SCROLL FOR NEXT