Pakistan Donkey Meat Export: चिनी कंपनीनं धमकी देताच पाकड्यांची तरारली, शाहबाज सरकारनं गाढवाच्या मांस निर्यातीला दिली मंजुरी; काय नेमकं प्रकरण?

China Trade Agreement Pakistan: पाकिस्तान सरकारने चीनला गाढवाचे मांस निर्यात करण्यास अधिकृतपणे मंजुरी दिली. ग्वादर हे शहर चीन पुरस्कृत प्रकल्पांचे मुख्य केंद्र मानले जाते.
Pakistan Donkey Meat Export
Pakistan pm Shehbaz SharifDainik Gomantak
Published on
Updated on

China Trade Agreement Pakistan: पाकिस्तान सरकारने चीनला गाढवाचे मांस निर्यात करण्यास अधिकृतपणे मंजुरी दिली. एका चिनी कंपनीने आपले कामकाज बंद करण्याचा इशारा दिल्यानंतर पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करत हा निर्णय घेतला. हा संपूर्ण वाद ग्वादर बंदरात कार्यरत असलेल्या 'हानगेंग ट्रेड कंपनी'शी संबंधित आहे, जी गाढवांचे मांस आणि कातडी चीनला निर्यात करण्याचे काम करते.

ग्वादर हे शहर चीन पुरस्कृत प्रकल्पांचे मुख्य केंद्र मानले जाते. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथील निर्यातीच्या मंजुरीसाठी प्रशासकीय पातळीवर मोठी दिरंगाई होत होती. या विलंबामुळे पाकिस्तानमधील विदेशी गुंतवणूक असलेल्या प्रकल्पांना नोकरशाहीच्या अडथळ्यांचा कसा सामना करावा लागतो, यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

अखेर कंपनीने गाशा गुंडाळण्याची धमकी दिल्यानंतर सरकारने हालचाली तीव्र केल्या. विशेष म्हणजे, पंतप्रधान शाहबाज शरीफ हे या महिन्याच्या अखेरीस एका गुंतवणूक मंचाच्या बैठकीसाठी चीन (China) दौऱ्यावर जाणार आहेत. या पार्श्वभूमीवर चीनला नाराज न करण्यासाठी पाकिस्तान सरकारने हा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

Pakistan Donkey Meat Export
Pakistan Economic Crisis: आर्थिक त्सुनामीनं पाकड्यांच्या उडाल्या चिंधड्या! युएईनं 2 अब्ज डॉलर्सचं कर्ज मागितलं परत; पाकिस्तानच्या खजिन्याला पडलं खिंडार

चीनमध्ये गाढवाच्या मांसाला आणि कातडीला मोठी मागणी आहे. याचा वापर प्रामुख्याने पारंपारिक औषधे बनवण्यासाठी केला जातो. ही औषधे विशेषतः रक्तवर्धक आणि त्वचेच्या समस्यांवर गुणकारी म्हणून विकली जातात. सरकारी आकडेवारीनुसार, पाकिस्तान दरवर्षी मांस आणि कातडीसाठी सुमारे 2,16,000 गाढवे चीनला निर्यात करतो. या व्यवसायातून पाकिस्तानला (Pakistan) दरवर्षी सुमारे 30 कोटी अमेरिकन डॉलर्सचा महसूल मिळतो, जो देशाच्या ढासळत्या अर्थव्यवस्थेसाठी महत्त्वपूर्ण मानला जातो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com