Goa Drug Peddling: कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर उघडपणे होतेय ड्रग्‍सविक्री, परदेशी पर्यटकाने पोलखोल केल्याने खळबळ

Drug peddling on Calangute beach: ‘पर्यटकांसाठी नंदनवन’ अशी जगभर ओळख असलेल्या गोव्याच्या पर्यटनाला पुन्हा एकदा ड्रग्‍सच्या विळख्याने गालबोट लागले आहे.
Drug peddling on Calangute beach
Drug peddling on Calangute beachDainik Gomantak
Published on
Updated on

म्हापसा: ‘पर्यटकांसाठी नंदनवन’ अशी जगभर ओळख असलेल्या गोव्याच्या पर्यटनाला पुन्हा एकदा ड्रग्‍सच्या विळख्याने गालबोट लागले आहे. उत्तर गोव्यातील जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर भरदिवसा आणि उघडपणे ड्रग्‍सची विक्री होत असल्याचा खळबळजनक प्रकार, भारतात भटकंतीसाठी आलेल्या एका परदेशी पर्यटकानेच समोर आणला आहे.

या पर्यटकाने सोशल मीडियावर शेअर केलेला व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत असून प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या पर्यटकाने आपल्या व्हिडिओमध्ये कळंगुट किनाऱ्यावरील वास्तव मांडले आहे.

Drug peddling on Calangute beach
Tourist deaths in Goa: राज्यात पर्यटकांच्या मृत्यूंनी वाढली चिंता, सव्वातीन महिन्यांत 29 प्रकरणे समोर; ड्रग्स, अपघातांसह गुन्ह्यांचे सावट

गजबजलेल्या या समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना काही ड्रग्‍स पेडलर्स खुलेआम पर्यटकांच्या जवळ जातात आणि त्यांना ‘ड्रग्‍स हवे आहे का?’ असे विचारतात.

Drug peddling on Calangute beach
Goa Drowning Death: सहलीचा आनंद अल्पकाळ टिकला, म्हादईत 21 वर्षीय तरुण बुडाला, दोन वेगवेगळ्या दुर्घटनांमध्ये दोघांवर काळाचा घाला

या पर्यटकाने दिलेल्या माहितीनुसार,कळंगुट समुद्रकिनाऱ्यावर फिरत असताना एका दलालाने मला गाठले आणि ड्रग्‍स हवे का असे विचारले. हे अत्यंत धक्कादायक आहे. सार्वजनिक ठिकाणी असे प्रकार घडणे अनपेक्षित आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com